#माझ्यातलीमी
#विकएंड_टास्क(१/११/२५)
#वर्तमानपत्रातील_सदर_लेखन
#छंद माझा
छंद माझा किती सांगू? मी सांगू तुम्हाला मला कोण-कोणते छंद आहेत. म्हणजे बघा हं! लहानपणी मातीत खेळायचा छंद होता. मातीत खेळता खेळता तोंडात सुद्धा चालण्याचा खूप छान छंद होता बरं! हा छंद सोडावा म्हणून आईच्या नाकात नऊ आले होते. ती गोष्ट वेगळी चव आहे. तर असो, लहानपणीचाच छंद तो सुटता सुटला म्हणायचा.
तसा अभ्यासाचा छंद नव्हता, पण काय करणार? गोड मानून तो छंद पण जोपासला हो; म्हणून तर बी.ए. पर्यंत शिक्षण झाले. हा छंद जोपासताना आईचा मोठा वाटा आहे बरं का! तर त्यावेळी उजळणी म्हणजे आपले पाढे पाठ असावे लागायचे. माझे पहिले पाढे पंचावन्न.
मग काय? आईच्या हातात पट्टी आणि माझे किंवा वेळ पडल्यास पाठ. हात मोकळी जागा तिथे आईची पट्टी हे गणित ठरलेलं. तर असो, उगाच मला परत पाढे पाठ करण्याचा छंद लागायचा. जे पाढे शाळा संपली पाढे विसरले. तर हा पण एक छंद होता हो, शिक्षणाचा भाग म्हणून जपलेला.
जसं जसं आपण पुढे-पुढे जातो तसं तसेच वेगवेगळ्या वळणावर वेगवेगळे छंद म्हणा अथवा प्रयोग म्हणा, हे आपण करत असतो.
शाळेत असताना एक शिवणकाम म्हणून विषय होता. त्यात वेगवेगळे टाके, भरतकाम, मोतीरंग, असं काही बाहेर शिकवायचे. झाले त्यात मी सगळे टाके शिकून घेतले. माझी आई त्यावेळी भरतकाम, स्वेटर विण, छान रांगोळ्या काढणं ठिपक्यांच्या असायच्या ना. आता कलाभारती गालीचा आणि काय नी काय. क्रोशेचे काम, वायरच्या विणकाम करून समोसे खायचे, नाही हो? W या आकाराच्या पिशव्या काय हे सगळं. अर्थात उन्हाळ्याच्या सुट्टीत मी पण हे केले म्हणजे आईने करवून घेतले. त्यामुळे हा सुद्धा छंद लागला होता.
दहावीची परीक्षा झाली आणि आता सारखे पेंटिंग वगैरे चे क्लास नव्हते, पण काळ्या कापडावर डिझाईन काढून टिकल्या सोनेरी लेस चिकटवून छान तसबीर तयार करणं, मांजर पाटाच्या कापडावर भरतकाम करून टेबल क्लॉथ तयार करणं असे छोटे-मोठे छंद जोपासले होते.
जात्यावर दळण काढणं, लाल तिखट बनवण्यासाठी लागणाऱ्या सुक्या मिरच्या भाजणे त्यानंतर त्या उखळात कुटणं – हा छंद एकदाचा प्रयोग म्हणून किंवा काय होतं हे पाहण्याची म्हणून केला. पण त्यानंतर जे काही छंदामुळे हाल झाले ते आता सुद्धा तिखट खाताना आठवतात बरं का! सायकल शिकण्याचा पण छंद जोपासलेला. पूर्ण शिकले पण तेव्हा तब्येत तोळामाटासा सायकल उंच कैची मारून चालवायला शिकलेले पण बघू म्हटलं सिटवर बसून चालवत येते का? दोन पेडल मारले असतील नसतील अचानक तुटली ना चेन. बरं तू तुटलीस ना, मग पडायचं ना बापडे बाजूला पण नाही, सरळ माझ्या पायाला घालताना वेटोळा मी पडले. सायकल उरावर पडली, पाय खेचला गेला, छान रक्ताची चिंब उडाली. मग हाही छंद पायामुळे कायमचा रामराम करून सोडून दिला.
पहिली सांगितली की माती-पाणी हे माझे आवडते क्षेत्र. मग काय? बागकामाचा छंद लागला. किती प्रकारची फुलं, झाडं, फळझाडं लावली काय विचारू नका! ही टोपली-टोपली भरून गावठी गुलाब लाल, गुलाब, पांढराशुभ्र गुलकंद बनवायचे. आता आवारात थोडीशीच फुलझाडं आहेत. मोगरा तर एवढा फुलायचा की चैत्रापासून पार आषाढा पर्यंत फुलायचा. तो हो, मोठी बादली भरून ओसंडून जायची.
कोबी, फ्लॉवर, पांढरे कांदे, मिरच्या, वांगी, टोमॅटो – आम्हाला बाजारातून भाजी आणायची गरजच पडायची नाही. तर असा छान छोटासा माहेरच्या अंगणातील बरसणारा छंद लग्न झाल्यावर आपोआपच संपुष्टात आला. आता दुसऱ्यांच्या बाल्कनीतील बाग बघण्याचा छंद जडवून घेतला आहे.
कानसेन हा छंद तर आपल्याला जोपासावा लागतोच ना? पण गेहे छंद मधूर मिलिंद मकरंद म्हणजे गाणं ऐकायचा छंद आहे. पण शाळेत हा पण म्हणजे संगीत विषय होता आठवी ते दहावी. थोडा आवाज बरा होता म्हणून त्यावेळी काही गाणी म्हटली पण त्या नंतर नाही म्हणता आली. पण गुणगुणत राहायचा छंद आजही जोपासला आहे बरं का? आता तर काय मोबाइल फोनमुळे काही कुठे गाणं ऐकता पण येत आणि गाता पण येत. तर हा छंद आजूनही चालू म्हणजे सुरू आहे.
आणखी एका छंदाचा बदल सांगायचं म्हणजे माझी आई सुगरण आहे पण मला कुकर कसा लावायचा हे पण माहित नव्हते. आई नेहमी कानिकपाळी ओरडायची, “अगं सासरी गेलेल्या वर आमचा उद्धार होईल, हिला काही आईने शिकवले नाही वगैरे वगैरे.” पण आता मी दोन्ही प्रकारचा म्हणजे व्हेज, नॉनव्हेज स्वयंपाक करून शकते.
हा छंद आपोआपच माझ्या अंगावर येऊन आदळला. म्हणजे त्याच असं झालं की ताई घरातील जेवणाची बघायची. तिचं लग्न झालं आणि ताईची जाग धाकट्या बहिणींनी घेतली. या दोघांनी आजीकडून आईकडून छान स्वयंपाक शिकून घेतलेले. पण मी बागकाम आणि इतर कामातच रमलेली. थोडे विषयांतर झाले तर असो. धाकट्या बहिणीचं लग्न माझ्या आधी झालं. मग आता हे सर्व अर्थातच माझ्याकडे आलं. मग नाइलाजाने मला हा स्वयंपाक छंद एका महिन्यात शिकून घ्यावा लागला.
पण खरं सांगू, माझ्या सासूबाईंनाही पण तेवढा स्वयंपाक येत नव्हता. उलट त्यांना मी बेसन लाडू, करंज्या हे पदार्थ शिकवले. पण मला माझ्या सासऱ्यांनी भाकरी करायला शिकवली. त्यांना सर्व दिवाळीचे पदार्थ आणि जेवण बनवता येत होते.
तर हे असे आहेत काही होण्यासारखे आगळे-वेगळे छोटेसे पण छान छंद. हो, हे माझे आवडते छंद.
आजून एका महत्त्वाच्या छंदाचा विषयावर लिहायचं राहून गेलं आहे. काय म्हणू काय विचारताय अहो? लेखनाचा छंद. हा छंद तसा जुनाच आहे पण आता एक एक प्लॅटफॉर्म उपलब्ध झाले आहेत त्यामुळे लेखणी आणि कागदाची मारामारी थांबली असली तरीही मोबाईलच्या कीपॅडवर बोटांनी टाईप करून लिहिण्याचा छान छंद लागला आहे. आता हा छंद जोपासताना तेवढेच वेगवेगळे विषय मिळतात त्यामुळे लेखणी सुद्धा कशी ऐटीत चालते या गिरणी तशी बोटाची लेखणी भरभर चालणे हो!
त्याच बरोबरीने बागकाम करताना मला पक्षी निरीक्षणाचा पण छंद लागला होता पण तो आजही छान सुरू आहे कारण किचनच्या खिडकीतून पोपटी, सांळूक्या, कावळे, चिमण्या, कबूतर, घारी या सर्वांचे दर्शन घडते. प्रवास करण्याचा पण छंद आहे. दुसऱ्यांच्या मनातलं जाणून घेण्याचा पण छंद आहे. तेवढं बापडे त्याचं दुःख हलकं होतं. आनंद देण्याचा छोटासा छंद पण आहे.
#शब्द_संख्या_८९४_आहे.
#०१_११_२०२५
©️®️ #सौअपर्णाजयेशकवडे.
