#माझ्यातलीमी #विकएंड टास्क

#माझ्यातलीमी
#विकेंड_टास्क
#रसग्रहण_गाण्याचे

“#जिथे सागरा धरणी मिळते तिथे तुझी मी वाट पाहाते”
हे १९६१ च्या मराठी चित्रपट ‘पुत्र व्हावा असा’ मधील हे क्लासिक प्रेमगीत आहे. गायिका: सुमन कल्याणपूर, संगीत: वसंत प्रभू, कविता: पी. सावळाराम. हे गाणे प्रेमाच्या विरह आणि मिलनाच्या अपेक्षेचे सुंदर चित्रण करते. ऐकताना मजा येते!

जिथे सागरा धरणी मिळते
तिथे तुझी मी वाट पाहाते।

डोंगरदरीचे सोडून घर ते,
पल्लव पाचूंचे तोडून नाते
हर्षाचा जल्लोष करूनी
जेथे प्रीत नदीची एकरूपते।।१।।

वेचित वाळूत शंख शिंपले,
रम्य बाल्य ते जिथे खेळले
खेळाचा उल्हास रंगात येऊनी,
धुंदीत यौवन जिथे डोलते ।।२।।

बघुनी नभीची चंद्रकोर ती,
सागर हृदयी उर्मी उठती
सुखदुःखाची जेथे सारखी प्रीत
जीवना ओढ लागते ।।३।।

जिथे सागरा धरणी मिळते
तिथे तुझी मी वाट पाहाते

“जिथे सागरा धरणी मिळते तिथे तुझी मी वाट पाहाते”
हेच गाणं रसग्रहणा साठी का निवडले तर मला लहानपणी या गाण्यांचा अर्थ समजत नव्हता पण हे गाणं खूप वेळा सांज धार या रेडिओवर च्या कार्यक्रमात लागायचे.त्यानंतर जेव्हा टिव्हीवर मराठी चित्रगीत हा कार्यक्रम लागायचा त्यावेळी हे गाणं पाहिले.
हे गाणं, “पुत्र व्हावा असा”, या मराठी चित्रपटातील आहे.त्याच बरोबरीने हे गाणं जीवनकलाआणि विवेक यांच्या वर चित्रीत केले आहे. हा चित्रपट १९६१ मधला आहे.गायिका_सुमन कल्याणपूर, संगीत _वंसत प्रभूचे आणि कविता_पी.सावळाराम यांची आहे.
हे त्याकाळातील क्लासिकल प्रेमगीत आहे.गाण्याचे बोल आपल्याला अगदी सागर किनाऱ्यावर घेऊन जातात.
पहिल्या कडव्यात प्रेयसी प्रियकराला सांगते आहे की मी तुझी वाट पाहत आहे कुठे तर जिथे सागरा ला धरणी मिळते. डोंगरदरिचे सोडून घर ते ही जी उपमा दिली आहे ती तिने तिच्या माहेरच्या संदर्भात दिली आहे.ती त्याला सांग ते आहे की मी माझं माहेर घर सोडून तुला भेटायला इथे आले आहे. कशी तर हर्षाचा जल्लोष करुन जिथे सागरा आणि नदीची प्रित एकरुप झाली आहे.
दुसऱ्या कडव्यात प्रेयसी प्रियकराला सांगते , जिथे माझे बालपण शंख शिंपले वेधण्यात ,आनंदात गेला.
बालपणीचे खेळ खेळताना मी कधी यौवनाच्या उंबरठ्यावर आले ते कळलं नाही पण आता मला तुझी साथ या टप्प्यावर हवी आहे.
तिसऱ्या कडव्यात प्रेयसी प्रियकराला सांगते की ती नभीची चंद्रकोर बघुन सागराच्या हृदयात एक प्रकारची उर्मी उठते हे खरं आहे की पौर्णिमा असली की सागराला खूप मोठी भरती येते. जणू काही सुख दुःख
जिथे सारखी ओढ लागलेली असते, म्हणजे सागराला भरती येते म्हणजे ते सुखाचे प्रतिक तर ओहोटी लागली आहे म्हणजे दुःखाचे प्रतिक .
हे सर्व गाणं सागर, नदी,धरणी यांच्या माध्यमातून प्रेयसीने आपल्या भावना आपल्या प्रियकराला सांगितल्या आहेत.
सागर म्हणजे एक स्वच्छंदी जीवन जगणारा तर धरणी म्हणजे सहनशील, आपल्या तत्त्वावर काम असणारी कोणत्याही परिस्थितीत खंबीरपणे तग धरू राहाणारी असं काहीस या गाण्यांतून आपल्याला कळत.
तर आता हे गाणं गुणगुणत मला या गाण्याचे रसग्रहण का लिहावेसे वाटले किंवा काय आठवण तर हे गाणं समुद्रावर चित्रीत केलेले आहे.माझ बालपण अलिबाग येथे गेले त्यात अलिबागचा समुद्र किनाऱ्यावर खूप वेळा जात व्हायचे. त्यामुळे लहानपणापासून सागर ची ओळख म्हणा ओढ म्हणा ही होतीच.
माझं लग्न झालं म्हणजे मला पुण्यात दिलं , इथे दुर पुण्यात कुठला सागर पण नाही म्हणायला आम्ही दोघे
देहू ला इंद्रायणी नदी काठावर जायचो. पण सागराचे आणि माझे नाते काही तुटले नाही . आता तुम्ही म्हणाल कसं काय तर माझं सासर गोवा म्हणजे ना मला सागराने सोडलं आणि नाही मी सागराला सोडलं .तर ही अशी आहे माझी छान आठवण, गोव्यातील नद्या एवढ्या मोठ्या आहेत की जणू काही सागरच गावां गावात वाहातो आहे असे वाटते.मांडवी,झुआरी,बोरी,
समुद्र किनारा पण आहे पण या नद्यांचे सौंदर्य पण खूप छान आहे.
#०४_१०_२०२५_शनिवार
©️®️ #सौअपर्णाजयेशकवडे

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!