#माझ्यातलीमी
#विकंएड_टास्क
#जाहिरात_लेखन
कथा: “सूर्याची साथ”
एकदा देहूरोडच्या एका छोट्या कॉलनीत राहणारी अपर्णा नावाची गृहिणी होती. तिच्या घरात सासूबाई आणि सासरे (आई-वडील), दोन मुलं आणि नवरा – सगळे एकत्र राहतात. अपर्णा सकाळी उठून घरकाम सांभाळते, मुलांना शाळेत जाण्यासाठी तयार करते, आणि दुपारी छोटासा घरगुती व्यवसाय चालवते. पण एक मोठी समस्या नेहमी तिच्या मागे लागलेली: वीज कट! “अहो, ऐकलं का? आज परत लाईट गेली,” असं म्हणत अपर्णा रोज वैतागून जायची. दिवसभर मरमर काम करायचं, आणि संध्याकाळी घरात पाऊल टाकलं की अंधार. मेणबत्त्या शोधण्यापासून ते जनरेटरचा धूर आणि आवाज – प्रदूषण तर होतंच, पण वीज बिलही महिन्याला हजारो रुपयांचं येत होतं. महागाईच्या काळात तोंडमिळवणी कठीण होत होती, आणि वरून हे वीज दर सतत वाढवणारे.
एके दिवशी भिशी पार्टीसाठी मसाला तयार करत असताना परत लाईट गेली. घरात म्हाताऱ्या सासूबाई (आई) अंधारात पडल्याच असत्या, पण नशीबाने वाचल्या. मुलं शाळेतून आली तर एसी नाही, पाणी थंड नाही, मायक्रोव्हेव बंद. अपर्णा बोंबलली, “माणसांनी कसं करायचं?” म्हणत फोनवर फोन केले – मोबाईलची बॅटरी संपली, मग आईच्या फोनवरून सुरू. शेवटी नवरा हाफ डे घेऊन घरी आला, आणि वीजवाल्यांना बोलावलं. “मागील थकबाकी आहे म्हणून लाईट कट केली,” म्हणतात ते. अपर्णाने शांतपणे सर्व बिलांच्या पावत्या दाखवल्या, तेव्हा कुठे लाईट आली. पण हे रोजचं झालं होतं. सणवार आला की संप होतो, मागण्या पूर्ण होतात, पण दोन-तीन दिवसांनंतर परत तेच – लाईट गेली की गेली!
मग एका मैत्रिणीकडून अपर्णाला ‘सोलर टेक’बद्दल कळलं. ही कंपनी सूर्याच्या ऊर्जेने घर चालवण्यासाठी सोपी, विश्वसनीय आणि स्वस्त सोल्यूशन देते – हाय-क्वालिटी सोलर पॅनल्स, बॅटरी स्टोरेज आणि स्मार्ट कंट्रोल सिस्टम. अपर्णाने विचार केला, “का नाही ट्राय करून बघू?” आणि बसवून घेतलं. आता काय? घरात २४ तास वीज असते, बिल जवळपास शून्य झालं, प्रदूषण नाही! मुलं आरामात अभ्यास करतात, आई सुरक्षित राहते, आणि भिशी पार्टीतही सगळं परफेक्ट. अपर्णा आता खुश आहे, तिचं घर स्वावलंबी आणि हिरवंगार झालं. कॉलनीतील इतर लोकही सोलर टेककडे वळले, आणि अपर्णाच्या जीवनात सूर्यप्रकाशाने खरा उजेड आला. ती म्हणते,
“#आता_लाईट_कटची_चिंता_नाही, फक्त सूर्याची साथ आहे!”
#सोलर टेक_सूर्याची_शक्ती, तुमच्या हातात!
#२३_०१_२०२६_शुक्रवार.
©️®️#सौअपर्णाजयेशकवडे.
