#माझ्यातलीमी #लघुकथा_लेखन_टास्क (२/३/२०२६)

#माझ्यातलीमी
#लघुकथा_लेखन_टास्क(२/३/२०२६)
#लघुकथा_टास्क_साठी
#शीर्षक_दोन_घासातला_एक_घास.
“आला होळीचा सण, चल नाचू या!”
किती कर्णकर्कश आवाजात गाणी सुरू आहेत! पूर्वीसारखं काही राहिलेलं नाही.
“निलीनी, पुरणाची डाळ शिजली का?”
“हो आई, तयार झालं.”
“आज मंदा मावशी कामाला येणार नाहीत!”
“का गं?”
“कोकणात गेल्यात होळीला. वर्षातून दोनदा गावी जातात – गणपती आणि होळी.”
“निलू, तुला सांगते, पहिल्यांदा मंदा आपल्याकडे आली तेव्हा होळीचे दिवस होते. घरात चार तोंडे, नवरा व्यसनी… तिला काम करावं लागलं. चाळीत राहत होतो तेव्हा पाठीमागच्या दारी उभी राहिली. ‘दोन-तीन दिवस खायला काही नाही. पोटाची भूक बसून देत नाही. लेकरं पोळीसाठी हट्ट करतायत.’ हे ऐकून माझ्या पोटात गलबल झालं. मी तिला लगेच कामावर ठेवलं.”संध्याकाळी घरी जाताना जेवणाची ताट वाढून दिलं.
“जेवणाच ताट पाहून तिच्या डोळ्यात पाणी आलं. आता दहा-बारा वर्षे झाली आपल्याकडे काम करते. दोन-तीन वर्षांपूर्वी मी म्हटलं, ‘सण गावी साजरे कर.’ ‘पैसे कुठून?’ म्हणाली. मीच थोडे पैसे आणि सामान दिलं. इतका आनंद झाला!
गणपती-होळीला तिकिटाचे पैसे आणि वाण सामान देते. जेवढे दिवस कामाला येईल, तेवढे दिवस मी तिला मदत करणार.”
निलूने आईकडे पाहिलं. डोळ्यात अभिमान आणि पाणी.
“आई, तुम्ही खरंच ग्रेट आहात! मी हे लक्षात ठेवीन. माझ्या दोन घासातला एक घास तरी कुणा भुकेलेल्याला देईन.
कारण सणाचा खरा आनंद म्हणजे वाटून घेणं!”
#शब्द_संख्या_२५५
#०३_०३_२०२६_मंगळवार
©️®️ #सौअपर्णाजयेशकवडे.

error: Content is protected !!