#माझ्यातलीमी #लघुकथालेखनटास्क(२३/२/२०२६)

#माझ्यातलीमी
#लघुकथालेखनटास्क(२३/२/२०२६)
#कथा

दिवेलागणीची वेळ झाली. आई, तुम्ही देवापुढे निरंजन लावलं नाही?
“अक्षय मला सोडतच नाही. शाळेतून आल्यापासून रडत होता. ‘आजी, मी उद्या पासून शाळेत जाणार नाही,’ म्हणत होता. कसंबसं समजावलं, पण आता पोराचं अंग तापलंय.”
“पण एवढं असं काय घडलं की तो रडत घरी आला आणि आता हा ताप? मी उद्या शाळेत जाऊन विचारणारच आहे. एक महिन्यापूर्वीही त्यांनी असं केलं होतं. पाच-सहा दिवस शाळेत गेलाच नाही. तेव्हा होमवर्क पूर्ण नव्हता म्हणून शिक्षा केली. पण आता तर होमवर्क मी रोजच्या रोज पूर्ण करून घेते. मग काय प्रॉब्लेम असेल? दुर्लक्ष करू चालणार नाही.”
“निलू, दोन दिवसांनी केतन येणार आहे. त्याला घेऊन जा शाळेत. बाबा म्हणून त्यांचीही काही जबाबदारी आहे की नाही?”
“आई, हे हो! काय अक्षय, अंगावर हे वळ कसे?”
“अरे बापरे, मी बघितलं तरी च नाही; नाहीतर दुपारीच फोन केला असता!”
“आई, मी केतनची वाट पाहत बसणार नाही. हे प्रकरण वेगळंच आहे. मी उद्या सकाळी शाळेत जाऊन विचारणारच.”
“हो, विचार. पण आधी अक्षयला लाडीगोडीने काय झालं ते विचारून घे.”
“अक्षय बाळा, हे कुणी मारलं तुला?”
“सरांनी!”
“पण का मारलं? तू आता लहान नाहीस, चांगला नववीतला घोडा आहेस. तू काही केलंस नाही ना?”
“आई, मी काही केलं नाही असं नाही. पण ते सर मुलींना मुद्दाम ओढवे पाहण्याची शिक्षा करत होते. ते सुद्धा मुलांना कडे पाठ करून स्टेजवर ओढवे उभे राहायचे. मी फक्त एवढंच बोललो की, ‘सर, स्टेजवर अशी ओढवे नका द्या. दुसरी कुठलीही शिक्षा द्या.’ म्हणून मला सरांनी मारलं!”
“आजी म्हणते की, तुला काय करायचं होतं, हे आईला सांगू नकोस.”
“आई, हे बरोबर नाही. तुम्ही त्यालाच सांगता, ‘माझ्यापासून लपवून ठेव’ म्हणून. ते काही नाही!”
“घालबाई, तुला काय गोंधळ घालायचा? उद्या शाळेत जाऊन. माझ्याकडून मी सांगण्याचा प्रयत्न केला.”
“आई, ‘पण मी माझ्या बाळासाठी उभी राहाते, तर मी चुकीची ठरते?'”
#२३_०२_२०२६_सोमवार
©️®️ #सौअपर्णाजयेशकवडे.

error: Content is protected !!