#माझ्यातलीमी #ब्लॉग लेखन टास्क (22/12/25)

#माझ्यातलीमी
#ब्लॉग लेखन टास्क (22/12/25)
#आईचा_सल्ला
सोहम नुकताच पदवीधर झाला होता. आता तो नोकरीच्या शोधात होता.
आजकालच्या या आधुनिक शहरात राहत असल्यामुळे, त्याला खूप सारे पर्याय उपलब्ध होते. त्यामुळे सोहमला वाटले की आता सर्व काही आपल्या हातात आहे. हे जगच माझे आहे! मी आता कुठल्याही क्षेत्रात उडी मारू शकतो आणि १००% यशस्वी होऊ शकतो.
सोहमकडे एवढे पर्याय होते की जणू सर्वत्र पर्यायांची रेलचेंलच होती. नोकरीच्या वेगवेगळ्या क्षेत्रातील जाहिराती, ऑनलाइन कोर्सेस, स्टार्टअप आयडिया, लग्नासाठी ॲप्स – सर्व काही! भरीस भर म्हणून मित्रही सल्ला देतात: “IT कर, नाहीतर मार्केटिंग किंवा स्वतःचा व्यवसाय सुरू कर.” लग्नासाठीही त्याच्याकडे १००+ प्रोफाइल्स होत्या. पण हे सर्व असूनही, जेव्हा सोहम रात्री झोपायला जातो, तेव्हा त्याच्या डोक्यात विचारांचा काहूर माजतो. प्रत्येक पर्याय योग्य वाटतो, पण नक्की काय करावे हे कळते पण ठरत नाही. अशी अवस्था होऊन जाते की सोहमला अस्वस्थता वाटू लागते. दिवसभर स्क्रीनवर फिरत राहिल्यामुळे मनाची शांती गमावून बसतो.
सोहममधील हा बदल आईला बरोबर जाणवतो. न राहून एक दिवस ती सोहमला सल्ला देते: “बाळ सोहम, माणसाकडे पर्याय जास्त असतील तर त्याला त्याच्यासाठी योग्य काय आहे याचीही समज राहत नाही.”
त्या रात्री सोहम खूप रडतो. ज्या आईला आपण आडाणी समजत होतो, तिनेच आपल्याला या संकटातून बाहेर काढले. त्याला समजून चूकले होते की पर्यायांमुळे तो स्वतःला हरवून बसला होता. पण योग्य वेळी आईने मार्गदर्शन केले. त्या क्षणी त्याला आठवले की आपण जुन्या डायरीत काही स्वप्ने लिहिली होती. त्यातील एक स्वप्न होते की आपण डॉक्टर बनायचे. या बाजूला आपले दुर्लक्ष कसे झाले?
त्या रात्री सोहमला चांगली झोप लागते.
सकाळी सोहमचा मूड फ्रेश आहे, हे त्याच्या चेहऱ्यावरून आईला जाणवते. तो आईला ‘थँक्स’ म्हणतो. मग मित्रांना भेटतो आणि सांगतो: “नुसते पर्याय निवडू नका, तर मनापासून काय करायचे ते आधी ठरवा! छोट्या-छोट्या स्टेपने सुरुवात करा, म्हणजे ध्येयापर्यंत नक्की पोहोचाल.” मी जेव्हा या पर्यायाच्या जंजाळातून मार्ग काढला, तेव्हा कुठे मला खरे सुख मिळाले.
#शब्द संख्या 288
#22_12_2025_सोमवार
©️®️ #सौअपर्णाजयेशकवडे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!