#माझ्यातलीमी #ब्लाॅगलेखन

#माझ्यातलीमी
#ब्लाॅग_लेखन_टास्क(२५/११/२५)
*आयुष्यामध्ये डिलीट बटण नक्की ठेवा.*
*कारण काही खोटी नाती, काही खोटी माणसं आणि काही चुकीच्या आठवणी हे सर्व डिलीट झालंच पाहिजे.*
#ब्लाॅग_लेखन
आयुष्यामध्ये डिलीट बटण नक्की ठेवा!. कसं असतंन जोपर्यंत एखाद्या गोष्टीचा आपल्याला अनुभव येत नाही तोपर्यंत सगळं कसं छान असतं; पण ज्यावेळी नकळत आपल्या कोणीतरी दुखावणे, अगदी हृदयाला पिळ पडणारा अनुभव देते तेव्हा आपण सरळ सरळ नातं तोडून टाकतो, पण त्यापेक्षा जास्त आपण ते दुःखदायक अनुभव कुरवाळत बसतो.
यातून नुकसान त्या दुःख देणाऱ्याचे होत नाही तर ते आपलेच होत असते.सतत तोच तोच विचार करून आपले मानसिक आरोग्य बिघडते आणि मग त्यातून अनेक समस्या निर्माण होतात.इतक्या की हार्ट अटॅक , मानसिक संतुलन बिघडते म्हणजे डिप्रेशन हे सर्व झाले की आलेच वेगवेगळे
डॉक्टर, स्पेशालिस्ट आणि काय काय पैसा परी पैसा खर्च होतो आणि हाती काहीच लागत नाही.
ज्याला त्याला फक्त आपला आनंद. हवा असतो त्यांना इतरांच्या दुःखाचे काही देणं घेणं नसतं. बरं ज्याच्या कडे पैसा असतो तो तर हे समजून वागतो की आपल्याकडे संपत्ती पैसा आहेना मग आपण दुसऱ्यांचा अपमान केला त्यांना अपमानास्पद वागणूक दिली तर काही हरकत नाही आपण सत्तेवर आहोत म्हणजे आपण सांगू तिचं पूर्व दिशा हात्याचा न्याय असतो. पण ज्यांना हे सर्व भोग भोगावे लागतात त्यांना मात्र फार त्रास होतो. म्हणजे तोंड दाबून बुक्क्यांचा मार जणू
काही मुक्याची ओरडणे ना आरोळी ना किंचाळी.
यावेळी मात्र आपल्या आयुष्यात डिलीट बटण नक्की ठेवा या आले पाहिजे. नाती जरी नाही पुसली तरी चालतील पण निदान ते वाईट अनुभव किंवा गोष्टी तरी डिलीट बटण दाबून नक्कीच डिलीट करता येतील असं वाटतं.
#कथा_लेखन
किती दिवस झाले सासूबाई आल्याचं नाहीत तुम्ही पण त्यांना फोन करत नाही ! सानिका समीरला बोलत होती . तेवढ्यात फोन आला कुणाचा आहे रे फोन कट का केलास.
तुला उचक्या लागत होत्या ना सासूबाई च्या तिचाच फोन होता.अरे समीर मग बोलायचं होतं की त्यांच्याशी उगाच कशाला असा राग धरायचा.त्या त्यांच्या जागी अगदी बरोबर आहेत.मूळात तुच चुकीचा वागलास त्यांच्या बरोबर माहिती असूनही एवढा ताठा बरोबर नाही हं समीर !
थोड्यावेळाने मीच फोन लावून त्यांची चौकशी करते . खरं तर तुझं नशीब चांगले आहे हे सर्व घडून सुद्धा त्या स्वतः जाऊन तुला फोन करतात तू उचलत नाहीस ती गोष्ट वेगळी पण सर्व चूक तुझीच आहे रे समीर!
तू केवढी मोठी चूक केली होतीस हे तरी मान्य करशील का?
काय मी चूक केली होती ती पण सर्वात मोठी ? चल चल मी काही चुकीचे केले होते असं वाटतंच नाही ना मला; जाऊ दे परत परत तोच तो विषय काढून मी कसा चुकीचा आहे हे दाखवून देऊन तुला काय मिळणार आहे गं सानिका!
काय या मिळणार आहे म्हणून तू विचारतोस समीर ,तू काहीच चुकीचे केले नाहीस असं वाटतं तुला; अरे त्या दोघांनी पै ई- पै ई जमवून कोकणात एवढी जमीन घेतली त्यात कष्ट करून आजच्या घडीला त्यांनी तुम्हा तिघांन साठी छान टुमदार तीन घर बांधली का तर तुम्ही दोन भाऊ आणि बहीण आनंदाने सुखाने सुट्टी तर सणावाराला येऊन मजा मस्ती करावी.प्रत्येकाला आपापली पेस जपता यावी म्हणून तर त्यांनी हे सर्व केले होते आणि समीर तू तुझ्या वहिनीने सांगितले म्हणून न सांगता तुझ्या वाटणीची दोन एकर जमीन सरळ सरळ विकायला निघाला होतास . वेळीच आप्पा च्या लक्षात आले म्हणून बरे झाले नाही तर तू तुझी जमिन विकून बसला असतास.
वहिनी आणि दादा नी तुला काय करायला भाग पाडले होते.हे तू विसरलास आणि आई आप्पा वर राग धरून बसलास.नशीब समज आई आप्पा च्या आयुष्यात डिलीट बटण नक्की ठेवालेले आहे पण अजूनही त्यांनी ते थांबले नाही. तू त्यांना समजून घेण्यात कुठे तरी चुक करतोयस.
कारण जर आई आप्पा काही खोटी नाती, काही खोटी माणसं आणि काही चुकीच्या आठवणी हे सर्व डिलीट झालंच पाहिजे असे म्हटलं असतं तर विचार कर रे समीर आज माझ्या लेकरांना आजी आजोबा मिळाले नसते.
तुला नाही रे कळणार समीर आजी आजोबा हे नातवंडासाठी किती गरजेचे असतात.तेच तर त्यांचे दिपस्तंभ
असतात भरकटत जाणाऱ्या जहाजाला आधार असतो .जाऊ दे.ओ मी पण कुठल्या गाढवा पुढे गीता वाचते .
धन्यवाद सानिका मॅडम तुमच्या मुळे माझे डोळे उघडले.
माझ्याकडे पण म्हणजे मी पण आयुष्यात डिलीट बटण नक्की ठेवालेले आहे हो! दुसरी गोष्ट म्हणजे तुला सांगतो तुला हे कळणे फार गरजेचे आहे.ते म्हणजे काही खोटी नाती, काही खोटी माणसं आणि काही चुकीच्या आठवणी हे सर्व डिलीट झालंच पाहिजे तर हो दादा वहिनी चे खोट नातं,ती खोटी माणसं आणि त्यांच्या आठवणी मी केव्हाच डिलीट केल्या आहेत.
बेल वाजली बघ कोण आलंय आधी नंतर लेक्चर दे.
आई आप्पा तुम्ही ! यानं आत ! समीर किती छान आश्चर्याचा सुखद धक्का दिलास .थॅक्यू… खूप खूप आभारी आहे हे नातं जपलस!
#२५_११_२०२५_मंगळवार
©️®️ #सौअपर्णाजयेशकवडे.

One comment

  1. G333 es una buena opción si quieres variar tus juegos y entrarle a nuevas experiencias. He tenido buenas rachas aquí. Checa lo que tienen en g333.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!