#माझ्यातलीमी # जागतिक योग दिवस, लेख स्पर्धा


विषय :- डिजिटल युगात योगाची गरज.

डिजिटल युगात योगाची गरज :- काळाची साक्षर हाक!.

“योग: कर्मसु कौशलम |”
(श्रीमद् भगवद्गीता २:५० )
योग म्हणजे केवळ आसन नव्हे, तर प्रत्येक कृतीत अंतकरणाने एकाग्रता ठेवणे आणि शरीर-मन-आत्मा यांचा समन्वय साधणे.

डिजिटल युग–सुविधा की संकट?

आजचा काळ म्हणजे माहितीचा महासागर. स्मार्टफोन, लॅपटॉप, सोशल मीडिया, कृत्रिम बुद्धिमत्ता, सतत ऑनलाईन राहण्याची गरज. या सर्वांचा जितका फायदा आहे तितकाच शारीरिक आणि मानसिक तणाव वाढवणारा तो प्रवाह बनला आहे.

कधी मोबाईल हातातून खाली ठेवला का?
डोळे सतत थकलेले, वाटतात का?
कामाच्या वेळा अनियमित?
सततचा थकवा, झोपेचा त्रास आणि चिडचिड?
ही लक्षणे आजच्या” डिजिटल जीवन शैली” ची दैनंदिन सावलीच झाली आहे. या सावलीला दूर करणारा उजेड म्हणजेच योग.

योग म्हणजे काय?
“योग” हा ” युज” या संस्कृत शब्दापासून तयार झाला आहे. याचा अर्थ आहे, जोडणे. आत्म्याचा ब्रह्माशी, श्वासाचा शरीराशी, आणि मनाचा वर्तमान क्षणांशी!. योग म्हणजे संपूर्ण व्यक्तिमत्त्वाचं संतुलनच. पतंजलींनी त्यांच्या योगसूत्रात सांगितलेले आहे

” योगश्चित्तवृत्तनिरोध “.
म्हणजे मनाच्या चंचल वृत्तींना शांत करणे हेच योग आहे. यात शारीरिक मुद्रा ( आसने), श्वास नियंत्रित करणे ( प्राणायाम ) ध्यान आणि नैतिक मूल्यांचा समावेश असतो.

योगाचे आठ अंग (अष्टांग योग)
यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी…..
ही पायरी-पायरी जीवनशुद्धीची वाट दाखवते.
योग ही साधना आहे,तीला जीवनशैली बनवा.
योगाची गरज सर्व मनुष्य जातींना आहेच पण विशेषतः आजकालच्या डिजिटल युगातही योगाची गरज प्रकर्षाने जाणवते.
डिजिटल युगातील समस्या आणि योगाचे उत्तर :-

आज आपण” डिजिटल नेटिव्ह ” बनलो आहोत. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण स्मार्टफोन, टॅब , लॅपटॉप आणि टीव्हीच्या स्क्रीन मध्ये गुंतलेले असतो. यामुळे आपली जीवनशैली बैठी झाली आहे. आणि अनेक शारीरिक आणि मानसिक समस्या वाढत आहेत, अशावेळी योग एक महत्त्वाचे आणि प्रभावी साधन ठरते.
या डिजिटल युगात खूप लहान वयात अनेक समस्या निर्माण होत असल्याने , योगा विषयी सर्व मनुष्य जातीला सजग करण्याची वेळ आली आहे.
(१)पाठ,मान, आणि सांधेदुखीवर मात:-

लॅपटॉप समोर बसून काम करणाऱ्या व्यावसायिकांना,” सर्वाइकल स्पोंडीलाइटिस”ही समस्या मोठ्या प्रमाणावर भेडसावते आहे यासाठी
* भुजंगासन, अर्धमत्स्येंद्रासन आणि मार्जरी आसन यासारखे आसने,
मणक्यांची लवचिकता वाढवतात आणि सांधे ही बळकट करतात.

(२) मानसिक ताणतणाव कमी करणे :-

सोशल मीडियामुळे सतत तुलना, कमी आत्मविश्वास,” FOMO”ही आधुनिक मानसिक आव्हान झाली आहेत
ध्यान, प्राणायाम, अनुलोम-विलोम या योग पद्धतीमुळे मन शांत होतं आणि चिंता ही कमी होतात.

(३) श्वसन व फुफ्फुसांचे आरोग्य सुधारते :-

विशेषतः पोस्ट कोविड काळात कपालभाती, भस्त्रिका, नाडी शुद्धी, प्राणायाम याचा वापर केल्यास श्वसन संस्थेचे आरोग्य सुधारते.

(४) स्क्रीन टाईम मुळे होणारा डोळ्यांचा त्रास कमी करण्यासाठी, दररोज त्राटक ध्यान, डोळ्यांच्या बुब्बुळाचे व्यायाम. हिरवळ पाहणे. ब्लिंकिंग केल्यामुळे डोळ्यावरचा ताण कमी होतो.

(५) झोपेचा दर्जा सुधारतो, झोप न लागणे ही आजच्या विशेषतः डिजिटल युगातील लोकांची सामान्य समस्या झाली आहे त्यासाठी योगनिद्रा, शवासन आणि झोपण्यापूर्वीचे सौम्य ध्यान मनाला शांत करून झोपेला आमंत्रण देतात.

(६) स्त्रियांचे हार्मोनल प्रॉब्लेम, मेनोपॉजच्या समस्या, पीसीओडी, थायरॉईड यावरही योग उपयोगी आहे.

योग आणि डिजिटल डिटॉक्स :- काळाची गरज .

डिजिटल डिटॉक्स हा नवीन ट्रेंड आहे. पण तो केवळ स्क्रीन पासून लांब राहणं एवढाच मर्यादित अर्थ नाही. योग ही खरी डिटॉक्स थेरपी आहे. शरीर, मन, भावना श्वास आणि ऊर्जा यांचे एकत्रित शुद्धीकरण. योगासन करताना आपण फोन, नेटवर्क, नोंदी सगळं बाजूला ठेवतो. हा विरामच आपल्याला स्वतःकडे परत घेऊन जातो.
” स्क्रीनचा ताण विसरा, योगाच्या श्वासात स्वतःला गवसा!

शाळांपासून ते कार्यालयापर्यंत :-

फक्त डिजिटल युगातच योगाची गरज नाही तर
लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांनाच योगाची गरज आहे.
विद्यार्थी :- लक्ष केंद्रित न होणे, परीक्षांचे ताणतणाव.
तरुण :- स्क्रीन एडिक्शन, चुकीची पोश्चर पद्धती मुळे
दुखणं.
वृद्ध :- सांधेदुखी, हृदय विकार आणि झोपेचा त्रास.

मला पुन्हा पुन्हा सांगावसं वाटतं की डिजिटल युगात योगाची गरज निश्चित आहे पण प्रत्येक वयोगटासाठी योग उपयोगी ठरतो. त्यामुळेच आज अनेक गोष्टी आयटी कंपन्याही कर्मचाऱ्यांच्या साठी, कॉर्पोरेट योगा, योगाचे विविध कार्यक्रम “आयोजित करतात.

डिजिटल क्रांतीमुळे सुविधा वाढल्या त्याचबरोबर जगण्यातून मनःशांतीच हरवू लागली आहे. योग हे आधुनिक युगातील समस्येवर जुने उत्तर आहे. तंत्रज्ञानाच्या अतिरेकेला तोलणारा तो एकमेव नैसर्गिक उपाय आहे. योग करूनच यंत्राचे दुष्परिणाम टाळता येतात कारण शरीर तंत्र योग्य ठेवायला योग शिकवतो.

या डिजिटल युगातील सर्वांनाच सांगावसं वाटतं.
डिजिटल चा वेग थांबवता येत नाही, पण योगाने त्यात शांती मिळवता येते!.
संपूर्ण दिवस ऑनलाइन राहा पण दररोज 30 मिनिट स्वतःमध्ये लॉगिन व्हा…. योगामध्ये!.

संगणक-यंत्रे संलग्ना ये जना : |
मनस: शान्तये योग्य कुर्वन्तु ते ||
देहोsस्तु स्वस्थो, चित्तं शांतम |
योग जयती योग: परम सुखम ||

सौ. स्मिता अनिल बोंद्रे.
©®.

1,039 Comments

  1. Авиабилеты по низким ценам https://tutvot.com посуточная аренда квартир, вакансии без опыта работы и займы онлайн. Актуальные предложения, простой поиск и удобный выбор решений для путешествий, работы и финансов.

  2. ДВС и КПП https://vavtomotor.ru автозапчасти для автомобилей с гарантией и проверенным состоянием. В наличии двигатели и коробки передач для популярных марок, подбор по VIN, быстрая доставка и выгодные цены.

  3. Лучшее казино https://download-vavada.ru слоты, настольные игры и live-казино онлайн. Простая навигация, стабильная работа платформы и доступ к играм в любое время без установки дополнительных программ.

  4. Играешь в казино? https://freespinsbonus.ru бесплатные вращения в слотах, бонусы для новых игроков и действующие акции. Актуальные бонусы и предложения онлайн-казино.

  5. Фриспины бесплатно бездепозитные бонусы бесплатные вращения в онлайн-казино без пополнения счета. Актуальные предложения, условия получения и список казино с бонусами для новых игроков.

  6. Тренды в строительстве заборов https://otoplenie-expert.com/stroitelstvo/trendy-v-stroitelstve-zaborov-dlya-dachi-v-2026-godu-sovety-po-vyboru-i-ustanovke.html для дачи в 2026 году: популярные материалы, современные конструкции и практичные решения. Советы по выбору забора и правильной установке с учетом бюджета и участка.

  7. Здравствуйте дорогие друзья! Очень актуальная тема — выбор кровельного материала. Суть здесь в чем: хочешь под ключ — вот сервис: [url=https://montazh-membrannoj-krovli-spb.ru]монтаж ПВХ кровли[/url]. Лично я убедился, что ПВХ мембрана — один из самых эффективных способов гидроизоляции. Например, рубероид трескается через 5 лет — соответственно мембрана этого лишена. Основные этапы: выбрать толщину мембраны. Вместо заключения: реальный эффект — крыша без проблем на годы.

  8. a href=”https://findyournextdirection.shop/” />official FindYourNextDirection site – Smooth navigation and fast-loading pages make browsing effortless.

  9. For those seeking an exceptional online gaming experience, [maxispin.us.com](https://maxispin.us.com/) stands out as a premier destination. At Maxispin Casino, players can enjoy a vast array of pokies, table games, and other thrilling options, all accessible in both demo and real-money modes. The casino offers attractive bonuses, including free spins and a generous welcome offer, along with cashback promotions and engaging tournaments. To ensure a seamless experience, Maxispin provides various payment methods, efficient withdrawal processes, and reliable customer support through live chat. Security is a top priority, with robust safety measures and a strong focus on responsible gambling tools. Players can easily navigate the site, with detailed guides on account creation, verification, and payment methods. Whether you’re interested in high RTP slots, hold and win pokies, or the latest slot releases, Maxispin Casino delivers a user-friendly and secure platform. Explore their terms and conditions, read reviews, and discover why many consider Maxispin a legitimate and trustworthy choice in Australia.
    Regardless of whether you’re an experienced copywriter or a newcomer, MaxiSpin.us.com offers the resources necessary to improve your content.

    **Features of MaxiSpin.us.com**
    Additionally, the platform offers a robust spin-text generator, allowing users to create unique versions of their content with ease.

    **Benefits of Using MaxiSpin.us.com**
    MaxiSpin.us.com is equally beneficial for individuals and small businesses.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!