#माझ्यातलीमी #कथालेखनटास्क

शीर्षक: हतबल
दोन दिवस झाले, संजीवनीने काहीच खाल्ले नव्हते. “आज तरी थोडं खा ना, संजीवनी! तू काहीच खात नाहीस. नारळाचं पाणी आणून दिलं, तेही तू पित नाहीस. असे कडक उपवास करून खरंच काही बदलणार आहे का?” अनघाने काळजीने विचारलं.
“अनघा, मी काही खाल्लं-पिलं नाही म्हणून परिस्थिती बदलणार नाही,” संजीवनी म्हणाली. “पण त्या दिवशी डॉक्टरांनी उपहासाने सांगितलं की, वजन कमी करायचं असेल तर खाणं कमी करणं गरजेचं आहे.”
अनघा म्हणाली, “संजीवनी, तुझ्यासमोरच मी डॉक्टरांना सांगितलं होतं ना, की तिला थायरॉईड आहे, आणि तोही वजन वाढवणारा! शिवाय, गेली पाच वर्षे ती शरीराला पोषक आहार घेत नव्हती. त्यावर डॉक्टर काय म्हणाले? ‘फक्त चहावरच का जगता?’ असं विचारलं. संजीवनी आणि तिचे मिस्टर दोघेच असतात. आजाराचं कारण फक्त खाण्यापिण्याच्या सवयींवर अवलंबून नसतं, तर परिस्थिती, ताणतणाव किंवा इतर कारणांमुळेही असू शकतं. पण हे डॉक्टरांना समजत नाही, यापेक्षा दुर्दैव काय!”
संदेशने संजीवनीचे हात हातात घेतले आणि अनघाला म्हणाला, “बरं झालं, तू तरी तिची बाजू मांडण्याचा प्रयत्न केलास. मी नेहमी संजीवनीला सांगतो, तुझ्या वाढत्या वजनाची काळजी करू नकोस. मला माहीत आहे, मी घरी असतो तेव्हाच ती व्यवस्थित जेवते किंवा काहीतरी खाते. नाहीतर एकटी असली की ती काहीच खात नाही. तिला जेवणासाठी किंवा काही खाण्यापिण्यासाठी कोणाची तरी साथ हवी. नाही तर बाईसाहेब फक्त चहा-कॉफीवरच जगतात. मग इतर आजार वाढतात. आजार वाढले की डॉक्टरकडे जावं लागतं. आणि डॉक्टर लगेच तिची दुखरी नस दाबतात, आणि ही मागचा-पुढचा विचार न करता अन्न-पाणी बंद करते.”
अनघा हसत म्हणाली, “म्हणूनच तर म्हणतात, सोबत त्यांनाच घेऊन फिरा जे तुमच्या गैरहजेरीतही तुमची बाजू मांडतील. ते म्हणजे तुझ्यासारखे, संदेश, आणि माझ्यासारखे, नाही का? चला, या निमित्ताने एक-एक कप चहा किंवा कॉफी होऊ दे! संजीवनी, अशी हतबल होऊन जाऊ नकोस.”
#शब्दसंख्या_224 शब्द
#१६_०९_२०२५_मंगळवार
©️®️ #सौअपर्णाजयेशकवडे

3 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!