#माझ्यातलीमी

** जिद्दी प्रज्ञाचक्षु **
बऱ्याचदा म्हणतात, ‘इट इज फिलिंग इज बिलिंग.’

ही गोष्ट आहे एका जिद्दी गुरुची आणि एका जिद्दी शिष्याची. आपण आपल्या जीवनातील आनंद जेव्हा हरवतो तेव्हा तो इतरांना कसा द्यायचा ही शिकवणारी, मनातील भीती आणि कोणतही वैगुन्य यावर मात करणारी.

म्हणूनच आंधळेपणा म्हणजे काय नाही! हे समजून घेण्यासाठी शिल्पा मैदंगी ह्या प्रज्ञाचक्षुला पहावं.

दृष्टिहीन असतानाही भरतनाट्यम शिकण्याची तीव्र इच्छाशक्ती आणि तिला शिकवणाऱ्या गुरूंची ही अनोखी कथा.

नृत्यामध्ये येणारे भक्ती, वात्सल्य, शृंगार हे भाव शिकणारी प्रज्ञाचक्षु म्हणजे शिल्पा.

त्यामुळे म्हणावं वाटतं, आपले अंतरचक्षु जेंव्हा उघडले जातात तेव्हा प्रश्न पडतात आणि जेव्हा बाहेरचे चक्षु फक्त उघडे असतात तेव्हा आपण उत्तराच्या शोधात फिरत असतो.
©️®️
टीप – दृष्टिहीन असलेली शिल्पा मैदंगी आणि तिच्या गुरु धनश्री आपटे यांच्या सत्य घटनेवर आधारित.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!