……….. महत्व बेलपत्रीचे………..
सुशीला अगं, तब्येत बरी नसतांना १०८बेलपत्री वाहण्याचा तुझा आग्रह का? विश्रांती घ्यायची सोडून इतक्या लवकर उठून हे सगळं करण्याचा तुझा अट्टाहास का?
अहो,बरोबर आहे तुमचं. कित्येक वर्षे चालू असलेला माझा नेम असा कसा मोडू. पटत नाही मनाला…. पण तब्येत चांगली तर सगळे चांगले असं तूच म्हणतेस ना!
हो, पण आपली ज्यावर नितांत श्रद्धा आहे ते डावलता येत नाही.
आजचा दिवस म्हणजे शिवाचा आवडता महिना श्रावण व त्याचा वार सोमवार. पार्वतीच्या घामाच्या थेंबामुळे बेलवृक्षाची निर्मिती झाली व त्याच्या प्रत्येक अवयवात देवींचा वास असतो. म्हणून आजच्या दिवशी शिवपार्वतीची पूजा करून शिवाला १०८ बेलपत्रे वाहिली तर सगळ्या देवतांचे आपल्याला आशीर्वाद मिळतात……..
शब्द संख्या.. १००
……….. अंजली आमलेकर………. २८/७/२५

регистрация перепланировки [url=https://soglasovanie-pereplanirovki-kvartiry3.ru/]https://soglasovanie-pereplanirovki-kvartiry3.ru/[/url] .