#माझ्यातलीमी
#लघुकथालेखनटास्क
(१२/०१/२०२५)
#महत्वाची_असते_वेळ
#स्वप्नीलकळ्या🥀
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
ओजस्वीचे वय जवळपास पासष्टीच्या जवळपास.ह्या वयात जोडीदार नसेल तर त्याची कमतरता जास्तच जाणवते.
ओजस्वी दररोज एकटीच सकाळी नियमितपणे न चुकता तीन किलोमीटर फिरायला जायची व कानाला हेडफोन लावून मस्त देवाचे स्तोत्र ऐकायची. .
तिच्या घरी इनमिन तिघेजणचं. मुलगा सून आणि ती. मुलगा ऑफिसच्या कामात अत्यंत बिझी .
घरात बोलण्यासाठी ही अजिबात वेळ नसायचा.बिचारी एकटीच स्वतः ला कोणत्या ना कोणत्या छंदात गुंतवून घ्यायची.
अचानक मुलाची कंपनीने सिंगापूरच्या महत्वाच्या प्राॅजेक्टसाठी निवड केली .ओजस्वीने मनापासून मुलाच्या करिअरच्या आड न येण्याचे ठरविले. जड अंत:करणानेच त्याला सिंगापूरला जाण्याची परवानगी दिली. त्यांची तयारी सुरू होती.
दरम्यान नेहमीप्रमाणेच त्यादिवशीही सकाळी सहा वाजता ओजस्वी घरून फिरायला म्हणून बाहेर पडली. बहुतेक वेळा ती रस्त्याच्या कडेने किंवा फुटपाथवरून फिरायची. त्यादिवशी फिरताना अचानकपणे तिच्या बुटाला कशी काय ठोकर लागली तिचे तिलाही कळले नाही. तोल जाऊन ती फुटपाथवर जोराने पडली.तिच्या गुडघ्याला बराच मुका मार लागला होता.ओठावर दात रूतल्यामुळे रक्ताची धार लागली होती.रक्त पातळ होण्याचे एकोस्प्रिन औषध घेत असल्याने रक्त लवकर थांबेना. घर बऱ्याच अंतरावर असल्याने तिने मुलाला लगेच बोलावून घेतले.
मुलगा ताबडतोब गाडी घेऊन तिच्या तेथे पोहोचला.तिला अगदी हाताने धरून जवळच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला. डॉ .नी लगेच पुढील कारवाई सुरू केली.
सर्वप्रथम तिच्या ओठाला दोन टाके घालण्यात आले.
कारण ओठाला खोल जखम झाली होती.दोन्ही पायांना व गुडघ्याला सूज
आली होती .एक्सरे काढण्यात आले. गुडघ्याचे हाड फॅक्र्चर झाले नव्हते पण जबरदस्त मुकामार लागल्याने गुडघ्यातील रक्तवाहिन्यांमध्ये आतल्या भागात रक्तस्राव झाला होता.तशी काळजी करण्यासारखीच परिस्थिती निर्माण झाली होती.पण मुलाने व सुनेनी अतिशय उत्तमरित्या तिला दोन महिने सांभाळून घेतले.
कंपनीला सांगून त्याने प्राॅजेक्टसाठी सिंगापूरला सद्य परिस्थितीत जाऊ शकत नसल्याचे सांगितले. आठ दिवस सुट्टी काढून संपूर्ण वेळ तिला दिला. तिची काळजी घेणारा जणू एक तो स्वतः डाॅक्टरच बनला होता. सर्वोतोपरी पूर्णपणे पाय ठीक झाल्यावरच त्याने सिंगापूरला जायचा निर्णय घेतला. सगळ्या परिस्थितीतओजस्वीच्या एक गोष्ट लक्षांत आली की हक्काची माणसं कारण नाही वेळ देतात,जसे तिच्या मुलाने कोणतेही कारण न देता फक्त तिला महत्वाचा वेळ दिला होता.
(३००शब्द)
©® रोहिणी अग्निहोत्री
(स्वप्नीलकळ्या)🥀
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

