वारीत हजारो माणसं होती. प्रत्येकाच्या हातात टाळ, डोक्यावर पालखीचा ओझा, ओठांवर अभंग. पण त्या दोघांकडे काहीच नव्हतं , ना टाळ, ना मृदंग, ना ओळखीचं कुणी.
ती होती तरुण वारकरीण, दुसरा नवखा तरुण. दोघंही आपापल्या दुःखात हरवलेले. पण त्या गर्दीत त्यांच्या नजरा एकमेकांवर स्थिरावल्या.तो नवखा होता . आयुष्यात पहिल्यांदाच वारी करत होता. शहरातलं फास्ट लाईफ सोडून, मनातलं रिकामेपण घेऊन तो इथे आला होता. सुरुवातीला सगळं परकं वाटलं. पण मग तिच्या नजरेनं त्याला थांबवलं. एकमेकांच्या डोळ्यात विश्वास दिसत होता,काहीतरी सापडल्याची जाणीव दोघांना झाली होती.
कोणतीही भाषा न बोलता, त्यांनी एकत्र ठेका धरला. मनातल्या ओव्या एकत्र गुंफल्या. हातांनी नाही, पण मनाच्या स्पंदनांनी मैत्री निर्माण झाली.
वारी संपली, पण त्या एका क्षणाने त्यांची आयुष्यं बदलली होती.

हटके
Khup chaan👌
Thank you
मॅडम वेगळे पण जाणवतयं. खूप सुंदर कथा. असेही वारीत होत असेलच.
Thank you
Thank you