तुझ्या माझ्या बेचिराख स्वप्नांच्या,
आता पुन्हा मशाली पेटल्या.
खिन्न मनाने,भग्न हृदयाच्या,
आता पुन्हा गझल लिहिलया.
शब्द तर जुनेच होते.
भावना वणवा होऊन विझल्या.
आता नाही रे लिहिली जाणार,
कविता तुझ्या माझ्या प्रेमाची.
भग्न मी, भग्न हृदयाच्या वाटा.
अंगणात पडला जरी चांदण्याचा सडा.
तुझ्या शिवाय मी त्या नाही वेचल्या.