#माझ्यातली मी..
#विकेंड टास्क
#ब्लॉग लेखन
#बॉक्स ऑफिस दि- २/८/२०२५
📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖
हाय, हॅलो, आणि नमस्कार!
मी आहे तुमच्या सगळ्यांची आवडती व्हीजे रिया! आपल्या आवडत्या चॅनल #माझ्यातली मी च्या ‘#बॉक्सऑफिस’ शोमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. वीकेंडची मजा दुप्पट करण्यासाठी, मी घेऊन आले आहे या आठवड्यातल्या सिनेमांचे ताजे रिव्ह्यू, बॉक्स ऑफिसचा रिपोर्ट कार्ड आणि येणाऱ्या सिनेमांची खास झलक.
चला तर मग, सुरू करूया आजचा फिल्मी प्रवास!
या आठवड्यातील नवे चित्रपट: हिट का फ्लॉप?
या आठवड्यात विविध विषयांवरील तीन सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला आले. कोणत्या सिनेमाने दिल जिंकला आणि कोणता मागे पडला, पाहूया!
पहिला चित्रपट * मराठी: “माझ्या वाटेवरचं आकाश”
* दिग्दर्शक: सुमित जाधव
* कलाकार: वर्षा देशपांडे, शशांक कवितके
* कथानक: एका महत्त्वाकांक्षी गृहिणीची ही कथा आहे, जी कुटुंबाची जबाबदारी सांभाळून आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी झटते. हा सिनेमा स्त्री-शक्तीची एक सुंदर गाथा सांगतो.
* माझी प्रतिक्रिया: “स्वप्नांना वय नसतं, हे दाखवणारा एक प्रेरणादायी सिनेमा!” हा चित्रपट सर्वांनी नक्की बघावा.
* कमाई: ₹5.5 कोटी
* माझा निर्णय: हिट!
चला तर मंडळी, आता घेते एक छोटीशी ब्रेक. तुम्ही पाहत राहा आपला आवडता चॅनल #माझ्यातली मी…
(जाहिरात सुरु होते)
(ब्रेकनंतर व्हीजे रिया पुन्हा येते)
नमस्कार मंडळी! “मी आले लगेच!” आता आपण वळूयात हिंदी चित्रपटाकडे. या आठवड्यात रिलीज झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. गाण्यांमुळे सिनेमा हिट होईल अशी अपेक्षा सर्वांनी केलेली, आणि ती खरी ठरली.
हिंदी चित्रपट: “रंगबाझ”
* दिग्दर्शक: सुमित भार्गव
* कलाकार: अमन कपूर, दीपिका कुमारी
* कथानक: मुंबईच्या गुन्हेगारी विश्वावर आधारित हा एक ॲक्शन थ्रिलर आहे. यात एका पोलीस अधिकाऱ्याची आणि गुन्हेगारांच्या टोळीची थरारक लढाई दाखवली आहे.
* माझी प्रतिक्रिया: “ॲक्शन, सस्पेन्स आणि भरपूर ड्रामा. प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा हा सिनेमा आहे!”
* कमाई: ₹11.3 कोटी
* माझा निर्णय: सुपरहिट!
जर तुम्हाला ॲक्शन सिनेमे आवडत असतील, तर हा चित्रपट नक्की बघा. पैसा वसूल चित्रपट आहे!
आता वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही कुठेही जाऊ नका, बघत राहा #माझ्यातली मी चॅनल.
(जाहिरात सुरु होते)
(ब्रेकनंतर व्हीजे रिया पुन्हा येते)
आता वळूयात इंग्रजी सिनेमा आणि या आठवड्यातील फ्लॉप चित्रपटाकडे
नमस्कार मंडळी! आपण पाहत आहात #माझ्यातली मी चॅनल आणि मी व्हीजे रिया तुमचं पुन्हा स्वागत करते. आता आपण वळूयात इंग्रजी सिनेमाकडे.
* इंग्रजी सिनेमा: “द व्हिस्परिंग वूड्स”
* दिग्दर्शक: जुली कॉलिन्स
* कलाकार: जेमी मॉर्गन, साराह रेड
* कथानक: एका प्राचीन जंगलातील रहस्यमय घटनांवर आधारित ही हॉरर-थ्रिलर फिल्म आहे. दोन मित्रांच्या प्रवासात त्यांना अनेक गूढ गोष्टींचा सामना करावा लागतो.
* माझी प्रतिक्रिया: “तुम्हाला रात्रभर जागं ठेवणारा सिनेमा आहे!”
* कमाई: $3.8 मिलियन
* माझा निर्णय: हिट!
रहस्यमय कथा आवडणाऱ्यांनी हा सिनेमा नक्की बघावा.
आता वळूयात या आठवड्यातील फ्लॉप चित्रपटाकडे.
* “मनं जुळता जुळता” (मराठी) सिनेमा:
* हा सिनेमा सर्वात निराशाजनक ठरला. जुन्याच कथांना पुन्हा सादर करण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला आहे.
* माझी प्रतिक्रिया: “मनं जुळण्याऐवजी, प्रेक्षकांचा सिनेमातून कनेक्टच तुटला!”
* कमाई: ₹1.0 कोटी
* माझा निर्णय: फ्लॉप!
तरीही भावनिक कथा आवडणाऱ्यांनी हा सिनेमा नक्की बघावा.
येणाऱ्या चित्रपटांवर एक नजर!
आता आपण शेवटच्या टप्प्यात आहोत, आता पुढच्या आठवड्यात येणाऱ्या चित्रपटांवर एक नजर टाकूया!
* हिंदी चित्रपट: “उडान”
* दिग्दर्शक: राज जोहर
* कथानक: एका पायलटच्या संघर्षाची ही कथा आहे. याचा ट्रेलर सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.
* मराठी चित्रपट: “तुझी आठवण”
* कथानक: कॉलेजमधील प्रेम आणि नंतरच्या आयुष्यात त्यांच्यावर होणाऱ्या परिणामांची एक भावस्पर्शी कथा आहे.
* इंग्रजी: “द कॉस्मिक इको”
* कथानक: अंतराळातील एका शोध मोहिमेवर आधारित साय-फाय फिल्म आहे. कथा वेगळी असल्यामुळे सर्वांना उत्सुकता आहे.
बॉक्स ऑफिस रिपोर्ट कार्ड
| सिनेमा | भाषा | कमाई | निकाल |
| रंगबाझ | हिंदी | ₹11.3 कोटी | सुपरहिट |
| माझ्या वाटेवरचं आकाश | मराठी | ₹5.5 कोटी | हिट |
| द व्हिस्परिंग वूड्स | इंग्रजी | $3.8 मिलियन | हिट |
| मनं जुळता जुळता | मराठी | ₹1.0 कोटी | फ्लॉप |
प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया
काही निवडक प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया पाहुयात. प्रेक्षक काय म्हणतात:
* “मी माझ्या आईसोबत ‘माझ्या वाटेवरचं आकाश’ पाहिला. खूपच छान होता!” – अंजली
* “रंगबाझ पाहून मजा आली. ॲक्शन खूपच जबरदस्त होती!” – आकाश
* “द व्हिस्परिंग वूड्स मुळे माझी रात्रभर झोप उडाली. खूपच भीतीदायक होता!” – रोहित
आता माझी निघण्याची वेळ झाली!
मित्रांनो, सिनेमा म्हणजे फक्त २-३ तासांचा अनुभव नाही, तो एक वेगळाच प्रवास असतो. एक अशी दुनिया जिथे आपल्याला हसवणारे, रडवणारे, घाबरवणारे आणि विचार करायला लावणारे अनेक किस्से पाहायला मिळतात.
आजच्या #बॉक्सऑफिस मध्ये एवढंच! पुढच्या आठवड्यात पुन्हा भेटू, नवीन गोष्टी आणि नवीन सिनेमांसोबत.
तोपर्यंत, सिनेमा पाहत राहा, आपल्या जवळच्यांना सोबत घेऊन जा आणि हो… सिनेमाचा अनुभव घ्यायला विसरू नका! पाहत राहा तुमचा आवडता चॅनल #माझ्यातली मी…
मी व्हीजे रिया, आता तुमची रजा घेते. पुन्हा भेटू! बाय, अँड कीप वॉचिंग मूवीज! ~अलका शिंदे
✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨
