# माझ्यातली मी
# कथालेखन टास्क
दि. 30 डिसेंबर 25
प्राध्यापक अविनाश सरदेसाई एक शांत सयंमी व्यक्तीमत्व ….आज आपल्या लहानग्या श्रेयस ला डे-केअरला सोडून कौटुंबिक न्यायालयाच्या दिशेने आपली गाडी चालवत होते. कितीही सावरल तरी विचारचक्र चालूच होत…आपण खूप समजावल ऋतुजा ला आपली भेट होणे एक योगायोग आहे तू मला आवडत नाही असे नाही तर कॉलेज च्या पहिल्या गेट टुगेदरलाच मी तुझ्या प्रेमात पडलो पण आपल्या परिवारातला व परिस्थितितला फरक आपले एकत्र येणे नाकारतो. पण माझ्या प्रेमात वेड्या झालेल्या त्या मुलीने सर्व बधंन झुगारुन शेवटी माझ्याशी विवाह केलाच. तिच्या आजीची मात्र तिला साथ होती
नव्याचे नऊ दिवस सरले .त्या अवधीत श्रेयस च्या रुपात प्रेमभेट मिळाली .ऋतुजा संसारात पुर्ण रममाण झाली होती.
श्रेयस चा पहिला वाढदिवस यानिमित्ताने तिच्या माहेरी आमंत्रण पाठवले त्यामुळे दोन घरातील दुरावा कमी होईल असे आईला वाटले आपणही होकार दिला तिथेच नियती हसली. वाढदिवसाला आलेल्या तिच्या आईने आमच्या घरची परिस्थिति पाहिली अन ऋतुजाच्या मनात विष पेरायला सुरुवात केली. शेवटी जन्मदेणारी आई जिकंली ? अन ऋतुजा लेकराचा पाश सोडून निघून गेली आज त्यांचा कोर्टातला शेवटचा दिवस. विचारातच तो कोर्टाच्या आवारात पोचला.वकील हजर च होते एवढ्यात ऋतुजा पण पोचली सोबत आजी होती का कुणास ठाऊक आतापर्यंत प्रत्येक तारखेवर उत्साहीत असलेली ऋतुजा आज मात्र कोमेजलेली दिसत होती.त्याच्याही काळजात कळ उठली …त्याचे खूप प्रेम होते तिच्यावर पण शेवटी नशीब म्हणून त्याने हे सारे स्विकारले होत ऋतुजाने अविनाश कडे पाहिले …वाढलेली दाढी ,कसेतरी परिधान केलेले बिना प्रेसचे कपडे, खोल गेलेले डोळे हे सारे पाहुन तिचा बांध फुटला अन घावतच जाऊन ती अविनाशच्या गळयात पडली. दोन्ही वकील अवाक झाले. एका पवित्र बधंना पुढे ते केस हारले होते.
एवढ्यात अविनाशच्या आई नातवाला घेवून आल्या .आजीनेपण त्यांचे हात पकडून अभिनंदन केले कारण त्या दोघींचा ब्रेन वॉशिंग प्रोग्राम 101% यशस्वी झाला होता.गेल्या काही दिवसांन पासुन दोघीनीही त्या दोघाचा संसार वाचवण्यासाठी प्रयत्न सुरु केले होते आवडती व्यक्ती कितीही चुकली तरी चुकांपेक्षा व्यक्ती महत्वाची हे दोन्ही मुलांना समजावण्यात त्या यशस्वी झाल्या होत्या.
आज कौटुंबिक न्यायालयात क्वचितच घडणारी पण समाजव्यवस्था सुदृढ करणारी एक आनंददायी घटना होती.
विनया देशमुख
शब्द संख्या….309
