#माझ्यातलीमी
#विकएंडटास्क (१/८/२५)
#बॉक्सऑफिस
टीव्ही स्क्रिन वर #बॉक्स ऑफीस चे पार्श्वसंगीत चालू होते आणि व्हीजे रॅश एकदम झोकात, हास्यवदनाने हातात माईक घेऊन येते.
हाय! हॅलो! नमस्कार!
मी रश्मी, म्हणजेच तुमची व्हीजे रॅश तुम्हा सर्वांचे आपल्या #बॉक्स ऑफीस या शो मधे मनापासून स्वागत करीत आहे.
या सुट्टीमध्ये किंवा इतर वारीही मित्र मैत्रिणींबरोबर किंवा तुमच्या प्रियजनांबरोबर सिनेमा जायचा प्लॅन करत असाल तर नक्की करा.
या आठवड्यात कोणते नविन मराठी किंवा हिंदी सिनेमे आलेत हे मी तुम्हाला सांगणार आहे.
“मैत्री तुटायची नाही” हा मराठी चित्रपट या आठवड्यात रिलीज झाला आहे. या सिनेमा मधे नवोदित कलाकार अभिनय गायकवाड आणि पुजा शिर्के यांनी काम केले आहे आणि सहकलाकार म्हणुन विजय भावे, अनुराधा कदम, पाहुणे कलाकार म्हणुन यशस्वी अभिनेते गिरीश महाजन यांनी काम केले आहे. (या वेळात टीव्ही च्या स्क्रीन वर अभिनेत्यांचे फोटो व त्या सिनेमाची पोस्टर झळकू लागतात.)
सिनेमाच्या नावाप्रमाणे च हा सिनेमा मैत्रीवर आधारीत आहे. नवोदित कलाकार अभिनय याने नावाप्रमाणे उत्तम अभिनय केला आहे आणि पुजा शिर्के ने ही चांगले काम केले आहे. सहकलाकारांनीही योग्य अशी साथ दिल्याने दिग्दर्शक समीर शिंदे यांचा हा चित्रपट विशेषतः तरुणांना सिनेमा हॉल पर्यंत खेचण्यास यशस्वी ठरला आहे.
“मैत्री तुटायची नाही” या चित्रपटाने उत्तम सुरवात केली आहे. पुढच्या आठवड्यातही या चित्रपटाची घोडदौड सुरू राहिल असे दिसतंय.
आपण स्क्रीन वर बघुया की या चित्रपटाला किती रेटिंग मिळाले आहे. व्हीजे रॅश बाजूला लावलेल्या स्क्रिन कडे बघते आणि पुढे सांगते.
समीक्षकांच्या मतानुसार या चित्रपटाला ४ स्टार मिळाले आहेत. (टीव्ही स्क्रिन वर ⭐⭐⭐⭐ दिसतात)
तर दर्शकहो, पुढच्या चित्रपटाबद्दल सांगण्यापूर्वी आपण एक छोटासा ब्रेक घेत आहोत.
(६० सेकंदाची म्युच्युअल फंड ची जाहिरात दिसते.
परत #बॉक्स ऑफीस चे पार्श्वसंगीत वाजते आणि व्हीजे रॅश टीव्हीमध्ये दिसायला लागते)
#बॉक्स ऑफीस या शो मध्ये मी तुमचे परत एकदा स्वागत करत आहे.
या आठवड्यात प्रदर्शित झालेल्या दुसऱ्या चित्रपटाचे नाव आहे. “काय म्हणू बाई”.
या चित्रपटात निखिल बर्वे आणि युक्ता कामत या सुपरहीट जोडीने काम केले आहे. (कलाकार आणि सिनेमाचे पोस्टर स्क्रीन वर दिसतात)
दोन्ही कलाकारांनी चांगले काम केले असले तरी चित्रपटाची कथा साधारण आहे. दिग्दर्शकाला ’काय म्हणू बाई’ हे नीटसे कळले नसल्याने प्रेक्षकांनाही या चित्रपटाला ’काय म्हणू बाई’ हा प्रश्न पडतो. हा चित्रपट फ्लॉप झाल्याचे एकूण चित्र दिसतंय.
आता स्क्रीन वर बघुया समीक्षकांनी या चित्रपटाला किती स्टार दिलेत. (टीव्ही स्क्रिन वर ⭐ दिसतात)
“समीक्षकांच्या मतानुसार या चित्रपटाला एकच स्टार मिळालाय.” व्हीजे रॅश बोलते.
आता यानंतर मी तुम्हांला एका हिंदी चित्रपटाबद्दल सांगणार आहे. तो कोणता आहे हे मी तुम्हांला एका ब्रेक नंतर सांगणार आहे. तोपर्यंत इथेच रहा कोठेही जाऊ नका.
(इथे वॉशिंग मशीन च्या कंपनीची जाहिरात लागते.
त्यानंतर एक विमा पोलिसी ची जाहिरात लागते.
दोन्ही जाहिराती झाल्यावर,
परत #बॉक्स ऑफीस चे पार्श्वसंगीत वाजते आणि व्हीजे रॅश टीव्हीमध्ये दिसायला लागते)
हाय!हॅलो! नमस्कार! मी रॅश तुमची होस्ट #बॉक्स ऑफीस या शो मधे या ब्रेक नंतर तुम्हांला या आठवड्यात प्रदर्शित झालेल्या हिंदी चित्रपटाबद्दल सांगणार आहे.
“दिल मेरा तूने लिया” या चित्रपटात मुख्य भुमिका हिंदी सिनेमा मधील यशस्वी अभिनेता सुनिल कपूर यांचा मुलगा आरव कपूर आणि यशस्वी अभिनेत्री देविना ची मुलगी दिया यांनी केल्या आहेत. नकारात्मक भूमिकेत कपिल बावेजा ने जान आणली आहे. तो एक उत्तम अभिनेता असल्याचे त्याने या भूमिकेत सिद्ध केलंय. भव्य चित्रपट बनवणारे अजय माळी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. (ज्यांची व्हीजे रॅश नावं घेते त्यांचे फोटो आपल्याला स्क्रीन वर दिसतात. आणि मग त्या चित्रपटाचा ट्रेलर दिसतो)
व्हीजे रॅश पुढे बोलते, मुख्य कलाकार जोडीने अभिनयात थोडीफार निराशा केलेली दिसत आहे. तरीही सिनेस्टार किड्स चे वलय काही प्रमाणात असल्याने तसेच सिनेमामधील सुंदर सेट आणि सुमधुर गाणी यामुळे हा चित्रपट यशस्वी ठरला आहे. चित्रपट गृहात जाऊन हा चित्रपट नक्कीच बघा. यातले भव्य सेट तुम्हांला थक्क करतील.
समीक्षकांच्या मतानुसार या चित्रपटाला तीन स्टार मिळाले आहेत (टीव्ही स्क्रिन वर ⭐⭐⭐ दिसतात)
परत #बॉक्स ऑफीस चे पार्श्वसंगीत वाजते आणि व्हीजे रॅश टीव्हीमध्ये दिसायला लागते)
आता घेत आहोत अगदी छोटा ब्रेक आणि व्हीजे रॅश सेट वरून बाजूला जाते.
(जाहिरात न लागता #बॉक्स ऑफिस चा सेट दिसतोय आणि नुसतेच पार्श्वसंगीत वाजते.
व्हीजे रॅश अगदी थोड्या मिनिटातच हातात माईक घेऊन येते.)
तर मित्रहो तुम्ही बघताय #बॉक्स ऑफीस हा शो आणि मी आहे या शो ची होस्ट रॅश.
मी तुम्हांला मागच्या आठवड्यात प्रदर्शित झालेल्या चित्रपटांबद्दल सांगितले.
आता पुढच्या आठवड्यात एक मराठी चित्रपट प्रदर्शित होणार आहे त्याबद्दल सांगते.
“मुंबई कोल्हापूर मुंबई” असे या मराठी चित्रपटाचे नाव आहे. हा एक भयपट आहे. या चित्रपटाचे प्रोमो तुम्ही टीव्ही वर पाहिलेच असतील. मुख्य भुमिकेमध्ये स्वानंद खामकर आणि रेश्मा पतंगे आहे. (स्क्रीन वर चित्रपटात काम करणारे अभिनेते आणि नंतर त्या चित्रपटाचा ट्रेलर दाखवला जातो.)
व्हीजे रॅश पुढे सांगते, या चित्रपटात मुंबई कोल्हापूर ट्रेन च्या प्रवासात एक दांपत्य आणि इतर सहप्रवासी यांच्या बरोबर काय घटना घडतात त्या दाखविल्या आहेत. चित्रपटाच्या प्रोमो वरून तरी चित्रपट उत्कंठा वाढविणारा वाटत आहे. ज्यांना भयपट आवडतो त्यांनी नक्की हा सिनेमा चित्रपट गृहात जाऊन बघा.
हा सिनेमा हिट ठरतो की नाही हे लवकरच पाहायला मिळेल.
हे झाले चित्रपट गृहात प्रदर्शित झालेल्या किंवा होणाऱ्या सिनेमाबद्दल.
जाता जाता ओटीटी सिनेमाबद्दल,
ओटीटी वर मागच्या आठवड्यापासुन “भेटेन मी नव्या जन्मी” सिनेमा चांगलाच गाजला आहे. पुनर्जन्मावर आधारीत या चित्रपटात, दुरदर्शन मालिकांमध्ये अभिनय करणारे अभिनेते राहूल मयेकर आणि स्वरगंधा या अभिनेत्रीने काम केले आहे. नक्की बघा.
तर,
आजचा हा #बॉक्स ऑफीस शो तुम्हांला कसा वाटला हे आम्हाला स्क्रीन खाली स्क्रोल होत असलेल्या वेबसाइट लिंक वर नक्की कळवा.
आता आपली होस्ट आर जे रॅश तुमची रजा घेत आहे. पुढच्या आठवड्यात तुम्हांला परत याच शो इथेच भेटेल. तोपर्यंत टाटा बाय बाय, नमस्कार.
(पार्श्वसंगीत वाजते आणि कार्यक्रम बंद होतो.)
©️®️ रश्मी बर्वे–पतंगे
१ऑगस्ट२५
नोंद :…. (या ब्लॉग मध्ये घेतलेली सिनेमाची आणि कलाकारांची नावे काल्पनिक आहेत.)


अभिनंदन 🌹
धन्यवाद 🙏
धन्यवाद 🙏
धन्यवाद 🙏