बायको नच तू दुर्गा

inbound368691315485421537.jpg

#माझ्यातलीमी
#लघुकथालेखनटास्क (१५/९/२५)
#लघुकथा

सोबत त्यांनाच घेऊन फिरा जे तुमच्या गैरहजेरीत तुमची बाजू मांडतील ..

🔥बायको नच तू दुर्गा 🔥

दिनेश अमृता नवराबायको उच्चशिक्षित ..ती आय टी क्षेत्रात,तो डॉक्टर .

एक पेशंट तिचे दिनेश बरोबरचे फोटो व्हायरल करते, आरोप करते चेकिंग बहाण्याने बोलवून गैरफायदा घेतला.. त्याची बदनामी होते ,नोकरीही जाते ..दिनेश खचून जातो .. अमृताला सांगतो माझ्याकडून काहीच चुकीच घडलेलं नाही

अमृता दिनेशच्या मित्राला डॉ विजयला जाऊन भेटते .ती विजयला सांगते ,”माझा दिनेशवर पूर्ण विश्वास आहे .मला ह्या प्रकरणातून त्याला सोडवण्यासाठी तुझी मदत हवी आहे.”

अमृता विजयच्या मदतीने हॉस्पिटलच्या डीनचे फोटो मिळवते आणि त्या पेशंट बरोबर AI टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने कनेक्ट करून डीनच्या केबिन मध्ये जाते .. डीन घाबरून म्हणतात ,” मी कधी ह्या बाईशी बोललो ही नाही मग माझे फोटो हिच्याबरोबर कसे ?”

विजय त्या पेशंटला बोलावतात .अमृता तिला तिचे डीन बरोबरचे फोटो व्हायरल करू का विचारते .. ती घाबरून म्हणते , “नाही अस कस शक्य आहे”?

अमृता तिला दरडावून म्हणते , डॉ दिनेश बरोबर तू कसे फोटो काढले ते सांग , मग मी सांगते ह्या फोटोबद्दल .. ती कबूल होत नाही, अमृता तिला धमकी देते , तू जर दिनेश बरोबरचे फोटो कसे काढले, का व्हायरल केलं हे आताच सांग नाहीतर बघ मी तुझे किती पुरुषांबरोबर फोटो व्हायरल करते ते ..

ती कबूल करते, कटकारस्थान करुन ती त्याला पेढा पाठवते ,खाण्यातून त्याला चक्करल्यासारखं होतं ,दिनेश ग्लानीत असताना तिने तसे फोटो काढले कारण तिला त्याला ब्लॅकमेल करून लग्न करायचं होत .विजयने तीच सगळ बोलणं रेकॉर्ड केलं..

डीन दिनेशला बोलावतात, दिनेशला सगळ कळल्यावर तो अमृताला म्हणतो,” मी नशिबवान आहे , माझ्यावर तू विश्वास ठेवला, माझ्या गैरहजेरीत माझी तू आणि विजयने बाजू घेऊन माझी निर्दोष मुक्तता केलीस ..बायको नच तू दुर्गा ..

®️©️ सौ स्वाती येवले (१५/९/२५)

शब्दसंख्या..२४५

5 Comments

  1. खुप छान कथा .. AI technology चा कसा गैरवापर होऊ शकतो ते खूप छान मांडलं ..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!