#माझ्यातलीमी
#लघुकथाटास्क (६/१०/२५)
#लघुकथालेखन
#बापमाणूस
बापमाणूस
अशोक एक सुप्रसिद्ध आणि नावलौकिक असलेला डॉक्टर.. नाव, पैसा सारं असूनही स्वतःच्या कोषात जगणारा.. स्वतःच्या मुलीला देखील त्याने कधी समजून घेतले नाही, कायम तिचा दुस्वास करायचा.. कारण तिच्या जन्माच्या वेळी कॉम्प्लिकेशन्स होऊन तिची आई गेली. आपण स्वतः डॉक्टर असून काही करू शकलो नाही याची त्याला खंत होती.
हीना चे मात्र आपल्या वडिलांवर फार प्रेम होते. वडिलांप्रमाणे तीपण खूप अभ्यासात खूप हुशार होती. त्यांच्याप्रमाणे आपणही डॉक्टर बनावं अशी तिची इच्छा होती. आणि तशी संधीही चालून आली. पण अशोकला आपल्या मुलीने डॉक्टर होण्यापेक्षा स्पर्धा परीक्षा देऊन सरकारी नोकरी करावी, लग्न करून संसार करावा असं वाटायचं, त्यामुळे त्याने तिला मेडिकल मधे प्रवेश घ्यायला कुठलीही मदत केली नाही.
मात्र अशोक चा मित्र स्वप्नील याने तिच्या मेडिकल च्या शिक्षणाची पूर्ण जबाबदारी घेतली. त्यामुळे अशोक आणि स्वप्नील यांचे कडाक्याचे भांडण झाले, त्यांची मैत्री पण तुटली.
स्वप्नील चा मुलगाही हीना च्या वयाचाच होता, पण त्याला संगीत क्षेत्रात पुढे जायचं होतं. स्वप्नील ने हाच विचार केला आरुष ला पण डॉक्टर होण्यात रस असता तर त्याने सर्वतोपरी प्रयत्न केलेच असते ना.. जसा आरुष तशीच हीना.
हीनाला मेडिकल शिक्षणासाठी हॉटेलवर रहावं लागलं. घरी गेल की वडील चिडायचे, भांडण उकरून काढायचे म्हणून ती सुट्यांमध्येही हॉस्टेल मधेच राहायची किंवा स्वप्नील कडे जायची. शिक्षण पूर्ण करून ती त्याच हॉस्पिटल मध्ये रुजू झाली.
अचानक एके दिवशी हृदयविकाराचा झटका आल्याने अशोक ला तिच्याच दवाखान्यात आणण्यात आलं. त्याची बायपास सर्जरी तिनेच केली. शुद्ध आल्यानंतर अशोकला सारे कळल्यावर त्याने स्वप्नील चे आभार मानले आणि म्हटलं, “तू बाप बनून माझ्या मुलीला शिकवलं, मी मात्र नावापुरताच बाप राहिलो. काही नात्यांना नाव नसते आणि काही नाती नावापुरतीच असतात, हे अगदी खरं आहे, आज पटलं मला.”
®️©️ मनिषा चंद्रिकापुरे (६/१०/२५)


Khup sundar
Good story
खूप छान 👌🏻📖✍🏻
खूप छान 👌
खूप सुंदर कथा 👌👌
Thank you
Thank you
Thank you
Thank you
Thanks