बघ स्मरले तुला….🌹
या रम्य सांजवेळी
बघुनी तारकांना
जणू काही मिळाला
स्मृतींना उजाळा
बघ स्मरले तुला….
ऊनाड वाऱ्यापरी मन
भिरभिरते जेव्हा
आवरुनी मग स्वतःला
बघ स्मरले तुला….
जणू माझाच तू
का हे नित्य मनी वाटे
पापणीत साठवूनी मग
बघ स्मरले तुला….
सोबतीला तू नसे रे
पण साथ तुझी कायम
श्वासात या जपताना
बघ स्मरले तुला….
✍️राणी
