माझ्यातलीमी #लघुकथाटास्क (६/१०/२५)
©®सीए संगीता मेहता पुणे मधुमक्षिका
काही #नात्यांना नाव नसते
आणि
काही नाती #नावापुरती असतात.
लघुकथा
कुठंही गेलं की मी तुम्हाला बहिणीसारखी म्हणत पर्समधनं राखी समोर धरणार.
का बरं फक्त स्त्री पुरुष या लिंगभेदामुळे हे गरजेचं आहे का? स्त्रीला मित्र असू शकत नाही म्हणून आश्रय मानलेल्या नात्याचा??
नाही बहीण मानलं तर बोलताना सहज मोकळं वाटणार नाही का? अपराधीपणाची भावना येईल का?
हे लेबल द्यायलाच हवं का ?
काही वेळा तर राखीचे धागे कच्चे ठरतात..त्या आड व्यभिचार चालू शकतोच.राखी म्हणजे पावित्र्यावर शिक्कामोर्तब असतं का? लोकापवाद टाळण्यासाठी एक गरजेचा उपचार?
राखी शिवाय ही नातं पवित्र असू शकतेच ..होय ना??
राखी बांधली म्हणजे मनात पाप नाही याची काय खात्री?
आजही तिनं सहानुभूती मिळवायला पोलिस चौकीत
साहेबांपुढं टेबलावर राखी ठेवली..आणि तोंडात जप पुटपुटत माळेतले मणी सरकवत राहिली.. अध्यात्मही थोतांड होतं..देवाशीही नातं तिला देखाव्यापुरतं जोडायचं होतं बहुधा.
पण,तो बदला नाही.
मी पोलिस ऑफिसर म्हणून सांगतो.लता जी!
नवऱ्याचा छळवाद बंद करा.नावापुरतं नातं बायकोचं पण तुम्ही कोणतंही कर्तव्य पार पाडत नाही आणि माझ्याशी काय भावाचं मानलेलं नातं सांभाळणार?
माणूस म्हणून सांगतो,”सुधारून दाखवा.नात्याला लेबल
न देताही भावाचं ऐकलं म्हणता येईल.नको ही राखी.
राखी देऊन एक प्रकारे तुमची चुकीची बाजू बरोबर म्हणून गळी उतरवायला पाहू नका.कशाला भुर्दंड ओवाळणी घालायचा?असे किती भाऊ मानले आतापर्यंत?काय वर्षभर राख्या घेऊन फिरता का?आणि प्रत्यक्ष भावाला मात्र कधी रांधून सुखानं चार घास खायला घातले नाहीत. तो तरी कुठं तुमची बाजू घेतोय?जिजाचींची चूक नाही तो ठासून सांगतोय.तो तुमचा दुश्मन तर नाहीच.
ती ओशाळवाणी झाली.चढलेला आवाज खाली आला.इथं ही राखीची मात्रा लागू पडली नाही.खजिल झाली.बाहेर चालू पडली.
खुटवड साहेबांनी एक निःश्वास सोडला.तिच्या नवऱ्याला
प्रेमानं चहा पाजला,म्हणाले,”आताच एक भाऊ बहीण येऊन गेले.आख्खा हात मानलेल्या बहिणींच्या राख्यांनी भरलेला पाहिलं की कधी कधी हास्यास्पद वाटतं.अशी अपराधाची भावना संपते का?प्रत्यक्ष बहिणीला इस्टेटीत वाटा द्यायचा नाही म्हणून तोडायचं.म्हणजे रक्ताचं नातं तीन दिवस सुतक पाळण्याइतपत फक्त..नावालाच.
तर अशा प्रकारे पोलीस चौकी म्हणजे रोजचंच कुरुक्षेत्र नात्यांचा फुसकेपणा उघड करणारं..खरंच..
काही नाती नावापुरती तर काही नात्यांना नाव नसतं.
©®सीए संगीता मेहता पुणे मधुमक्षिका


अवश्य वाचा
सुंदर 👌🏻📖✍🏻
हल्ली हेच चित्र दिसत खूप ठिकाणी
धन्यवाद सखी
खूप छान कथा
धन्यवाद