#माझ्यातलीमी
#सुप्रभात
#शतशब्दकथा (२१/७/२५)
#डायरी
#पुनश्च_हरि_ॐ
💚 पुनश्च हरि ॐ 💚
सुनैना ने सगळीकडे शोधलं. तिने जिवापाड जपलेली डायरी मिळेचना!
नववीपासून डायरी लिहिण्याची सवय. सुरुवातीला फक्त दिनचर्या लिहायची. पण आता तिच्या लिखाणाला साहित्यिक वळण आलेलं.
आलेले अनुभव त्यातून आपण काय शिकलो, काय चुकीचं वागलो, वागणुकीत कशी सुधारणा करायला हवी, मित्र – मैत्रिणींच जीवनात येणं, वाचलेल्या पुस्तांबद्दलचे विचार हे सारं लिहून ठेवायची.
“आत्या, बघ माझं विमान..” म्हणत अमेय धावतच आला. बघते तर काय! तिच्या या तीन वर्षाच्या भाच्याने तिच्या डायरीचे पानं फाडून विमान, बोट, बदक असं काय काय बनवलेलं.
“हसावं की रडावं” तिला कळत नव्हतं, भाच्याचं कौतुक वाटलं तिला. डायरी समोर त्या चिमुकल्याचा आनंद जास्त होता.
नवीन डायरी आणली.. पुनश्च हरि ॐ..
शब्दसंख्या: १००
®️©️ मनिषा चंद्रिकापुरे (२१/७/२५)
@ माझ्यातली मी

