ती भावंडांमध्ये सगळ्यात छोटी.तिला कधी कुणी तिचे मत विचारले नाही आणि तिनेही कधीच व्यक्त केले नाही. कमी बोलण्याचीच सवय लागली तिला.अगदी कामापुरते. नंतर लग्न झाले,नवरा पण हम करेसो कायदा असा.तसे आवाज वाढवावा असे प्रसंगही आले नाहीत कधी. नंतर आयुष्यात मुलगा सून आले.सून खूप बडबडी आणि एकदम मनात येईल ते बोलून टाकणारी बिनधास्त,अगदी हिच्या विरुद्ध टोक म्हणा ना.तशा तिच्या आणि सुनेच्या फारशा कुरबुरी कधी झाल्या नाहीत.पण सून मनातल्या मनात हर्ट होत होती.कधी तरी बोलूनही दाखवायची.तुम्हाला कशाचेच कौतुक नसते किंवा एखादी गोष्ट आवडली नाही तर तसेही बोलून दाखवायचे नसते.तुमच्या मनातले तुम्ही न बोललेले आम्ही कसे ओळखावे?जे वाटते ते बोलून दाखवावे. तिला सुनेचे बोलणे पटत असे.पण जन्माची लागलेली सवय तिला तसे करू देत नसे.
पण हे न बोललेल्या शब्दाचं ओझ वाढतच गेलं.त्या दोघीमधली धुसपूस, कुरबुर वाढत चालली तसे तिने स्वतःला बदलायच ठरवलं.तशी ती मनाने वाईट कधीच नव्हती पण तिच्या ना बोलण्याने गैरसमज होत असत.आता ती मोकळेपणाने बोलते आणि तिला हलके वाटते आहे.मनाशी विचार करते मी इतके दिवस ना बोलून मनाचा कोंडमारा का बरे करत होते?
राधिका पाटणे..

असं होतं खरं .. कधीकधी समजायला उशीर होतो ..
देरही सही अंधेर नही
Asinoinbet’s got a decent vibe going on. Little bit of everything, from sports bets to casino games. I’m mainly a slots guy but their sportsbook looked pretty comprehensive. A little more clarity on the bonus requirements would be helpful. Give it a look for yourself: asinoinbet.