#माझ्यातलीमी
#अलकलेखन(१८-९-२५)

‘मी तुझ्या बाजूने कधी विचारच केला नाही,’ हे वाक्य वापरून अलक लिहीणे.

तिच्या घरात पाऊल टाकताना तो थबकला. तिच्याकडे अश्रूभरल्या डोळ्याने पहात म्हणाला, “तो वंशाचा दिवा म्हणून त्याच्यासाठीच सारं केलं. पण तू जिद्दीने शिकून प्रगती केलीस. मला त्यानं वृद्धाश्रमात दाखल केलंय, कळताच तिथून थेट तुझ्या घरी घेऊन आलीस….. मुलगी मुलगी म्हणून मी कधी तुझ्या बाजूने विचारच केला नाही गं!

सौ. स्मिता सुनील देवकर-वाळुंज, पुणे.

One comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!