न तुटलेली नाळ

# माझ्यातलीमी# दीर्घ कथालेखन.

शीर्षक–‘न तुटलेली नाळ ‘
———————————-
‌‌. उमा बाईंच्या एकषष्ठीच्या निमित्ताने सगळे जमले होते .राजेश आणि योगिता ही यु.एस.ए .मधून आले होते .कार्यक्रम छान झाला उमाबाईंनी देवाला हात जोडून म्हटलं “एक तरी मुल दे देवा माझ्या राजेश योगिताला .”राजेश योगिता पुढे आठ दिवस थांबून मग
मग परत जाणार होते. त्या दिवशी सकाळी देवकीला थोडं बरं नव्हतं देवकी आणि योगिता दोघी जावांच चांगलं जमायचं .अगदी बहिणीसारखं नातं होतं त्यांच्यात. त्यादिवशी देवकीला थोडं बरं नव्हतं वाटंत.
” बरं नाही म्हणजे काय होतंय “असं विचारताच देवकीला रडूच कोसळलं.” काय सांगू वहिनी ,सर्व प्रकारची काळजी घेऊन सुद्धा असं कसं झालं समजत नाहीये. शशांक अजून कुठे जेमतेम वर्षाचा होतोय आणि मला पुन्हा दिवस गेलेत. ह्यांचं व माझं म्हणणं आहे अबॉर्शन करायचं. आईंना सांगितलं तर त्या रागावतीलच.” देवकी त्रस्त झाली होती आणि योगिताच्या मनाला पालवी फुटत होती .आशेचा किरण दिसत होता .
देवकी एक सुचवू? देवकिनी प्रश्नार्थक मुद्रेने योगिता कडे बघितलं
“हे बघ ,गैरसमज करून घेऊ नकोस .पण माझी एक विनंती आहे तुला. त्रास होईल थोडा. पण बघ माझ्यावर जर पूर्ण विश्वास असेल तर हे मूल जन्माला घालशील माझ्यासाठी. “वहिनी आम्हाला खरं तर आधीच्या दोन मुलांचं सर्व व्यवस्थित करता यावं म्हणून आता ——–
तू काळजी करू नकोस अगं या होणाऱ्या बाळासाठी तुझ्या तब्येतीसाठी सर्व खर्च आम्ही करू. तुम्हाला एका पैशाची ही तोषीश लागणार नाही .फक्त मला आपली मानत असशील तर हे नऊ महिने तुला माझ्यासाठी त्रास सहन करावा लागेल .प्लीज माझी विनंती आहे. .”योगिताच्या डोळ्यात अश्रू गोळा झाले.
उमा बाईना हे सगळं कळल्यावर त्या म्हणाल्या “आम्हाला म्हणजे मला आणि राजेशला अनाथ आश्रमातलं मूल दत्तक घेणं मान्य नाही पण योगितानीं
सुचवलेला पर्याय चालू शकतो. देवकी विश्वेश तुम्हां दोघांनाही विचारते आहे ..तुम्हाला जर पटत असेल तर काहीच हरकत नाही .पण —-देवकी आधी हो म्हणायचं आणि मग वेळ आली की मूल द्यायला नकार द्यायचा. त्यासाठी 17 कारणं द्यायची .हे मात्र मला अजिबात चालणार नाही .” योगिता ने देवकीकडे आर्जवी नजरेने पाहिलं .
उमा बाईने ठणकावलं “देवकी आत्ताच नीटविचार कर हो की नाही ते .आणि तू मनाने पक्की असशील तरच हा व्यवहार करायचा .ऐन वेळेवर भावनिक होऊन मूल देण्याला नकार दिला असं झालं नाही पाहिजे .उगीच दुसऱ्याला आशा लावायची त्याच्या भावनांशी खेळायचं आणि मग अपेक्षा भंग करायचा यासारखं दुःख नाही. काय ते विचार करून ठरव .”
शेवटी सर्वांच्या विचारांनी देवकीने मूल जन्मल्याबरोबर योगिताच्या पदरात टाकायचं ठरलं. योगिताला तर स्वर्ग दोन बोटंच उरला .देवकीच्या बाळंतपणाच्या खर्चाची सर्व व्यवस्था करून राजेश आणि योगिता यु .एस .ला परत गेले .
एक एक दिवस योगिताचा स्वप्न पाहण्यात जाऊ लागला. बाळाच्या आगमनाच्या आनंदाने ती हुरळून जात होती. सारखी फोनवरून देवकीच्या तब्येतीची चौकशी करत होती. तिला धीर देत होती .काळजी नको करू म्हणून सांगत होती .डॉक्टरांनी डिलिव्हरी डेट दिल्यावर एक महिना आधीच योगिता देवकीकडे राहायला आली. शेवटी तो दिवस उगवला .देवकीच्या पोटात कळा येऊ लागल्या .ताबडतोब दवाखान्यात ऍडमिट केलं बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकला आणि योगिताच सार अंग एका सुखद जाणिवेने मोहरलं .डोळ्यात पाणी आलं. सासूबाईंनी योगिता च्या पाठीवर प्रेमाने हात फिरवला. खूप बरं वाटलं तिला खोलीत बाळ बाळंतिणीला आणून ठेवल्यावर देवकीनच योगिताला हाक मारली .”वहिनी सांभाळा आपल्या कृष्णाला .” दाता आणि याचक दोघींच्या चेहऱ्यावर कौतुकाचे भाव होते .सासूबाईंनी दोघींवरून हात ओवाळून दृष्ट काढली.
क्रमशः

भाग दोन (२)
देवकी लक्ष्मीच्या पावलाने घरी आली. .योगिता वर सुखाची बरसात झाली ..तीनेच बाळाला घेऊन घरात प्रवेश केला .सासूबाईंनी तुकडा ओबाळून टाकला .बाळ बाळंतिणीची सगळी व्यवस्था उमाबाईंनी घरी करून ठेवली होती .त्यांनी योगिताला बजावलं “आता दोन महिने बाळाचे सर्व दूध ,पाणी ,गुटी ,अंघोळ ,तुला करायचं आहे .हो हे ‘बाळ संगोपनाचं ट्रेनिंग’ आहे असं समज. आणि बरोबर त्याच्या आईची देवकीची दंड शिव एही काळजी घ्यायची आहे. कारण ती ही ओली बाळंतीण आहे .” योगिता सर्व करायला आनंदाने तयार झाली देवकीचे तिने शंभर वेळा तरी आभार मानले. देवकीला मिठी मारून योगिता म्हणाली
“देवकी तुझं हे ऋण माझ्यावर कायम राहील. ”
” वहिनींच्या ओटीत आपण सुखाचं माप घातलं याचं तिला समाधान होतं .असं आहे मूल नसणारा, त्या मुलाचं खूप प्रेमानेच करेल पण नऊ महिने पोटात गर्भ वाढवून तो दुसऱ्याच्या आनंदासाठी त्याला देऊन टाकायला मात्र खरोखरच खूप मोठं मन लागतं. देवकीन तो मनाचा मोठेपणा दाखवला होता. ती दृढ निश्चयी होती .एकदा शब्द दिल्यानंतर तो पूर्णपणे पाळला गेला पाहिजे म्हणून तिने आणखी एक निर्णय घेतला .तिने दोन्ही मुलांना शशांक आणि अनुजाला घेऊन माहेरी जायचं ठरवलं.
तसं ही एकदा मुल जन्माला घातलं की त्याच्याबद्दल एक आंतरिक ओढ उत्पन्न होते. बाळाला एकदा छातीशी लावलं की ममता जागृत होते आणि मोह उत्पन्न होतो. आणि म्हणूनच तिने हा मोह उत्पन्न व्हायला नको म्हणून देवकीने माहेरी जायचं ठरवलं .उमाबाईना ही हे पटलं. ,कुठल्याही तऱ्हेचा भावनिक गुंता तिला नको होता .आईकडेही तिने कळवलं की या विषयावर कोणीही एक शब्दही बोलणार नाही. आणि चर्चाही करणार नाही.
हेदोन महिने योगीतानी उमाबाईंकडून बाळ संगोपनाचे धडे घेतल्यावर राजेश योगिता आणि त्यांचं बाळ ‘कृष्णा ‘ यु .एस. ला परत गेले. कृष्णा तर तिथले मित्र ,तिथली शाळा ,तिथले एकूण वातावरण यात इतका रमला की त्याला भारतात येणं आवडत नसे. थोड्या दिवसासाठी आले तरी त्याची सारखी कटकट चालायची. मग” भारतात किती डास आहेत ,शाळा आपल्या यू.एस .सारखी स्वच्छ नाही. मी आता इंडियात येणार नाही .मला इथे आवडत नाही .चल ना यु .एस .ला परत “मॉम मला इथे नाही राहायचं .मला इथे नाही राहायचं” म्हणून कृष्णा रडत होता .आणि देवकी कृष्णाला पोटाशी धरून समजावू लागली.” अरे बाळा हे सगळे तुझे भाऊ-बहीण आहेत .आपसात भांडायचं नाही बेटा .आणि आपल्या देशाला कधीही वाईट म्हणायचं नाही बर का ? देवकीच्या लक्षात आलं की कृष्णाला शेअर करायची सवयच नाही कोणतीही गोष्ट दुसऱ्याशी शेअर करायची सवयच नाही .त्यामुळे तो खूप अरेरावी करतो. इथल्या मुलांना आपली वस्तू दुसऱ्याला खेळायला देणं मिळून मिसळून याची सवय आहे राहणं याची सवय आहे .पण कृष्णाला आपला खेळ किंवा कोणती ही वस्तू दुसऱ्याबरोबर शेअर करणं माहीतच नाही. एवढंच काय टॉयलेट रूम मध्ये कोणी गेले नी ते पाण्याने ओलं झालेलं त्याला खपत नसे. केवढी चिडचिड करायचा तो यु.एस. ला तो एकटाच असल्यामुळे प्रत्येक गोष्ट त्याच्याच मनासारखी होत असल्यामुळे चार मुलांमध्ये तो राहूच शकत नव्हता, देवकीला मात्र वाईट वाटत होतं पण तिनेच आपल्या मनाला समजावलं की कृष्णाच काय परदेशातून भारतात आलेल्या सर्वच मुलांचा हा कॉमन प्रॉब्लेम आहे .
कृष्णा सोळा वर्षाचा झाला योगिताला कॅन्सर झाला होता. एकदम थर्ड स्टेजला तिथे लक्षात आलं. तिकडे सर्व गोष्टी स्पष्ट बोलल्यामुळे डॉक्टरने राजेशला नि योगितालाही त्यांच्याजवळ फार वेळ नसल्याची कल्पना दिली . तिथेही योगिताची ट्रीटमेंट चाललीच होती. कृष्णा तर अगदी हवालदिल झाला होता “मॉम, मॉम तुझ्यासाठी मी काहीही करायला तयार आहे. ..मला सोडून जाऊ नकोस” .असं म्हणून खूप रडला. “माझ्यासाठी काहीही करायला तयार आहेस ना ? मग मला इथे मरायचं नाही रे प्लीज . मला इंडियात घेऊन चला ” योगिता म्हणाली.
राजेश योगिता आणि कृष्णा भारतात सुखरूप येऊन पोहोचले योगिता ने निश्वास सोडला.. घरी आल्यावर योगिता आणि देवकी एकमेकींना भेटल्या दोघींच्या डोळ्यातून अश्रूंचा पूर वाहत होता .बहिणीचं नातं होतं ना ? “वहिनी असं कसं झालं हो ” देवकी विश्वेशलाही रडू आवरेना . विश्वेश आणि राजेशने कृष्णाला धीर दिला .अरे सर्व ठीक होईल वहिनींना इथे सगळ्यात मोठ्या डॉक्टरांना दाखवू. योगिताला हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं. तिथल्या डॉक्टरांनी त्याची कल्पना दिलीच होती. ऍडमिट केल्यापासून आठ दिवसात योगिताची तब्येत ढासळत गेली .देवकी आणि सर्व घरातली माणसं योगितासाठी रात्रंदिवस हॉस्पिटलला धावत होती.

.आठ दिवस सतत प्रयत्नानंतर ही डॉक्टरांना यश आलं नाही .सकाळी देवकी आणि कृष्णा योगितासाठी सूप घेऊन आले. योगिताच्या साऱ्या शारीरिक क्रिया अगदी संथपणे चालल्या होत्या आणि चेहरा निस्तेज झाला होता . कृष्णाला काही समजत नव्हतं. योगिता नि देवकीकडे पाहिलं आणि तिच्या डोळ्यात अश्रू साचले .”वहिनी काही सांगायचं आहे का? राजेश भाऊजींना पाठवू का ?” देवकीने योगिताचा हात हातात घेऊन विचारलं .योगितानी मानेनेच नकार दिला. आणि देवकीचा हात घट्ट धरून म्हणाली “देवकी तुझं ऋण फेडायची आता वेळ आली आहे. सोळा वर्षांपूर्वी तू तुझा कृष्ण माझ्या ओटीत घातलास आज मी यशोदा माझा कृष्ण तुझ्या ओठीत घालत आहे तुला परत करते आहे.” “वहिनी ,कृष्णा तुमचाच आहे तुमचाच राहील. देवकी कसे बसे अश्रू आवरत होती .योगिता ने कृष्णाला जवळ बोलावलं आणि त्याचा हात हातात घेऊन म्हणाली “कृष्णा तुझी मॉम गेली तरी बाळा तुझी आई जिवंत आहे. तिला अंतर देऊ नकोस बाळा”. कसेबसे चार शब्द कृष्णाशी बोलते न बोलते तोच कृष्णाच्या हातून त्याच्या मॉमचा हात गळून पडला आणि कृष्णाने मॉम म्हणून हंबरडा फोडला .डॉक्टर नर्सेस ची धावपळ सुरू झाली . आणि डॉक्टरांनी योगिता गेल्याच सांगितलं.
क्रमशः

भाग तीन (३)
सकाळी देवकी आणि कृष्णा योगितासाठी सूप घेऊन आले. योगिताने देवकीकडे पाहिलं आणि तिच्या डोळ्यात अश्रू आले . “वहिनी काही सांगायचं आहे ?राजेश भाऊजी ना पाठवू का ?” देवकी ने विचारलं. .योगिता ने मानेनेच नकार दिला .आणि देवकीचा हात घट्ट धरून म्हणू लागली “देवकी तुझे ऋण फेडायची आता वेळ आली आहे. सोळा वर्षांपूर्वी तू तुझा कृष्ण माझ्या ओटीत घातलास .आज मी यशोदा माझा कृष्ण तुझ्या ओटीत घालते आहे .तुला परत करते आहे.” .”वहिनी काय हे. कृष्णा तुमचाच आहे तुमचाच राहील” देवकी कसेबसे अश्रू आवरत होती .योगिता कृष्णाला जवळ बोलावून हातात हात घेऊन म्हणाली –
“कृष्णा तुझी मॉम गेली तरी बाळा तुझी आई जिवंत आहे. तिला अंतर देऊ नकोस ” कसेबसे चार शब्द कृष्णाशी बोलते न बोलते तोच कृष्णाच्या हातून त्याच्या मॉमचा हात गळून पडला .आणि कृष्णानी मॉम म्हणून हंबर्डा फोडला .डॉक्टर नर्सेसची धावपळ सुरू झाली. आणि.डॉक्टरांनी योगिता गेल्याचे सांगितले.
योगिताला घरी आणलं. पुढचे सगळे सोपस्कार झाले .कृष्णाचं केशवपन झालं कृष्णाने योगिताला अग्नी दिला .आणि मुलाचं कर्तव्य पार पाडलं. अलाहाबादला जाऊन तर्पण केलं . ह्या दहा दिवस मात्र एका वाक्याचा त्याला अर्थ लागला नव्हता. ” मॉम गेली तरी तुझी आई जिवंत आहे तिला अंतर देऊ नकोस” कोण आहे माझी आई ?आणि ती जिवंत आहे ?कुठे आहे? ?
तेरवीपर्यंत या प्रश्नाने त्याचं डोकं उठवलं. पण उत्तर सापडलं नव्हतं. .दुसऱ्या दिवशी यु.एस. ला परत जायचं होतं .देवकी काकुनी सर्व तयारी केली. बरोबर चिवडा फराळाचं दिलं . तिने कृष्णाला पोटाशी धरलं आणि तिला रडू कोसळलं. म्हणाली ‘” स्वतःला सांभाळ. यशवंत हो जयवंत हो औक्षवंत हो”
युएस ला परत आला तरी त्याच्या डोक्यातून मॉम्स ते वाक्य काही गेलं नाही. बेचैन होऊन गेला कृष्णा. मॉम च्या अस्तित्वा शिवाय घर त्याला खायला उठत होतं. त्याला कोणाशी बोलणं सुचत नव्हतं .राजेश तर आपल्या कामात व्यस्त होऊन गेला .पण कृष्णाची बेचैनी आणि अस्वस्थता त्याच्या नजरेतून सुटली नाही. एक दिवस राजेशनी कृष्णाजवळ ही गोष्ट काढली त्याला समजावलं “बेटा तू खूप केलीस आईची सेवा .पण आपल्या हातात ज्या गोष्टी नाही त्याचं दुःख करण्यात काय अर्थ .आता आपल्या कॉलेज कडे अभ्यासाकडे लक्ष दे. ” “डॅड हे सर्व मला समजतंय पण माझ्या मनात एक प्रश्न आहे त्याचे उत्तर मला सापडत नाहीये .तुला माहित आहे? “आणि त्यांनी मॉमचं शेवटचं वाक्य राजेशला सांगितलं .क्षणभर राजेश नुसता कृष्णाकडे पहात राहिला. काय करायचं त्याला सूचेना .तो गप्प झाला आज पर्यंत जे गुपित त्याच्यापासून लपवलं होतं ते उघड करू की नको ?
“,प्लीज माहीत असेल तर सांग माझं डोकं विचार करून फुटून जाईल डॅड. प्लीज ” आणि शेवटी राजेशनी त्याची जन्मकथा त्याला सांगितली. कृष्णा सुन्न झाला “देवकी काकू इस माय मदर? सॉरी ,सॉरी डॅड. जिवंत असताना मी तिचं तर्पण केलं.शी नेव्हर अटॅर्ड एवर्ड .काय वाटलं असेल तिला? काय झालं हे ?” कृष्णानी देवकीला पत्र पाठवलं ,खूपदा सॉरी सॉरी म्हटलं .कारण फोन करून बोलण्याची हिंमत झाली नाही .पत्र मिळताच देवकीने कृष्णाला फोन लावला .”अरे बाळा कृष्णा ,अरे सॉरी कशासाठी बेटा? मला तू तुझ्या मॉमचं सर्व क्रिया कर्म केल्याबद्दल अजिबात वाईट वाटलं नाही .अरे नुसता जन्म मी दिला पण पहिल्या स्पर्शापासून तीच तुझी आई झाली. तुझं सारं भविष्य तिन्ही घडवलंय अत्यंत प्रेमाने. आणि माझे तिचे संबंध अगदी सख्ख्या बहिणी प्रमाणे होते .कृष्णा तुझी मॉमच तुझी आई आहे .समजलं .”
कृष्णाच्या डोळ्यातून सतत अश्रू वाहत होते .फोनवर देवकी काकू बोलत होती आणि तो इकडे रडत होता. ऐकतो आहेस ना कृष्णा ? तेव्हा तुला मी तिच्या ओटीत टाकलं ,आता तिने तुला माझ्या ओटीत टाकलाय .शांत हो बाळा रडू नकोस. आणि कृष्णाने तिला मध्येच थांबवलं .” यू आर रियली ग्रेट देवकी काकू यु आर रियली ग्रेट ” “आय लव इंडिया .तुला भेटायला येत जाईन मी. तुला भेटायला येत जाईन आई.
*****
लेखिका – मनीषा लिमये
****
# माझ्यातली मी #दीर्घ कथालेखन
लेखिका- मनीषा लिमये
*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!