#माझ्यातलीमी
#लघुकथाटास्क
(२७/१०/२५)
निर्णय
ऑफिसमधून आल्याआल्या तन्मय म्हणाला,
“आई, मी शारदाशी लग्न करणार आहे.”
हे ऐकताच माधवराव बाहेर आले. त्यांच्या नजरेत आश्चर्य आणि आनंद तर देवयानीच्या नजरेत धक्का होता.
“काय म्हणतोस तन्मय?”
देवयानीचा आवाज कापरा झाला.
त्या सामान्य रूपाच्या, मध्यमवर्गीय घरच्या मुलीला आपण सुन म्हणून स्वीकारायचं?
तिच्या मनात विचारांचा गोंधळ माजला.
आपली प्रतिष्ठा, सौंदर्य, श्रीमंती… ह्यांच्या चौकटीत बसणारीच मुलगी आपल्या घरात यायला हवी, हीच तिची धारणा.
“का गेले आपण तिला पाहायला?” ती मनोमन पश्चात्ताप करत होती.
माधवराव मात्र शांत होते.
त्यांना शारदा आवडली होती… साधी, शिकलेली, परिस्थितीने घडलेली.
दिसायला चांगली असली तरी सुंदर म्हणता येईल अशी नसलेली तरी तिच्या स्वभावातले सौंदर्य त्यांना जाणवले होते.
देवयानीला बाह्य सौंदर्य महत्त्वाचं वाटायचं,
तर माधवरावांना मनाचं सौंदर्य.
त्यांना ठाऊक होतं… सौंदर्याचं खरं रूप हे विचारांमध्ये असतं, रूपात नव्हे.
म्हणूनच त्यांनी ठरवलं…
“मुलाचा निर्णय योग्य आहे.
त्याच्या पाठीशी राहायचे आणि शारदा सुन म्हणुन घरी आणायचे.”
©® शब्दगुंजन सीमा
सौ सीमा कुलकर्णी

