#माझ्यातलीमी
#लघुकथालेखन
#लघुकथा (२९/९/२५)
#नारीशक्तीचा_विजय_असो
💚 नारीशक्तीचा विजय असो 💚
अनुष्का रोजसारखी सायंकाळी आपल्या स्कूटी ने कॉलेज मधून घरी जात होती. रस्त्यावरच काहीश्या सुनसान जागी दोन टपोरी दिसणाऱ्या मुलांनी बाईक वरून येत तिला अडवलं.
काही दिवसांपासून रमेश तिच्यावर लक्ष ठेवून आहे हे तिला माहीत होतं, पण ती खूप धाडसी आणि हिमतीची होती. तिच्या कॉलेज चा माजी विद्यार्थी होता तो… अधेमधे कॉलेज मध्ये दिसायचं.
स्कूटी थांबवून ती खाली उतरली.. ते तिला स्पर्श करणार इतक्यातच तिने एकाच्या मुस्कटात मारली .. तो मागे ढकलल्या गेला .. तेवढ्यात दुसरा समोर आला .. तिने त्यालाही जोराचा धक्का दिला .. पुढे ती बोलली .. “तुम्हाला आई, बहिणी नाहीत का ..?”
“ए.. माझ्या आई बहिणीचं नाव घेणारी तू कोण ..? मापात राहायचं हां..” एक उद्गारला
“तुझ्या बहिणीला कुणी असा त्रास दिला तर चालेल का ..? सगळ्या स्त्रियांना पूजता न तुम्ही नवरात्रात .. आणि मोठ्या तोऱ्यात नवकन्यांना नवरात्री मधे पूजता ना .. लाज नाही वाटत असं एकट्या दुकट्या मुलीला बघून छेड काढायला ..!!?? मापात तुम्ही राहायचं..
स्त्री ला देवीचा अवतार मानून नवं दिवस पुजण्यापेक्षा तिचा कायम आदर करा. तिच्याच कुशीतून जन्म घेता ना, निदान त्याचं तरी भान ठेवा. वर्षातून एक दिवस तिला मान दिला, तिच्या कर्तृत्वाचे गोडवे गायले की झालं..!!?”
“पदोपदी तुम्हाला तिची गरज पडत असते.. कधी आई, बहिणी, मैत्रीण, बायको साऱ्या रुपात ती तुमची काळजी घेते.. हवं नको ते बघते, स्वतःचे स्वप्न, इच्छा आकांक्षा दूर ठेवून तुमच्यासाठी झटते.. आणि तुम्हाला स्त्री म्हणजे हवं तसं खेळण्याचं यंत्र वाटतं ..?!”
अनुष्का बोलत होती, तिच्या चेहऱ्यावर करारीपणा आणि तजेलदारपणा दिसत होता. ब्लैक बेल्ट होल्डर असल्याने तिने त्यांना जाम मारलं.
हे सारं सुरू असताना रस्त्यावर लोक जमा होऊन बघत होते. दोघेही माफी मागून निघून गेले, आणि साऱ्यांनी टाळ्या वाजवून तीच कौतुक केलं.
©️®️ मनिषा चंद्रिकापुरे (२९/९/२५)
शब्दसंख्या : २५३


Khup mast
Very good👍
Thank you so much
Thank you
Thank you