#माझ्यातलीमी
#लघुकथाटास्क (०५/०१/२६)
#लघुकथा
@everyone
दिलेले वाक्य : काही गोष्टी आयुष्य बदलून टाकतात, मिळाल्या तरीही नाही मिळाल्या तरीही..
💗 नशीब 💗
अंकिता च विपुल वर खूप प्रेम होतं पण तिला विपुलाचा काही अंदाजच येत नव्हता. स्वतः पुढाकार घेऊन त्याला आपल्या मनातलं सांगण्याची तिची हिम्मत होत नव्हती. तिची जिवलग मैत्रीण मोनाली तिला म्हणायची .. “तू सांगितलेच नाही तर त्याला कसं कळेल .. तुझं त्याच्यावर किती प्रेम आहे ते..! आणि मला त्याच्याही डोळ्यात दिसतं की तो पण तुझ्यावर तेवढंच प्रेम करतो. कदाचित त्याचीही अवस्था तुझ्यासारखीच झाली असेल, तोही बोलायला घाबरत असेल.. त्यामुळे आता तूच पुढाकार घेऊन त्याला प्रपोस कर..” पण अंकिताची काही हिम्मत झाली नाही.
तिकडे विपुल च पण तसंच झालेलं .. तोही बोलायला घाबरत राहिला.. तिने ”नाही” म्हटलं तर, आहे ती मैत्रीपण तुटली तर, तिच्या सहवासात छान वाटतं, दिवस चांगला जातो, ऑफिस मधे रोज भेटतोय, मी तिला सांगितलं आणि ती ऑफिसच सोडून गेली तर .. असे नाना विचार त्याच्या मनात यायचे.
दिवस जात होते.. इकडे दोघांच्याही घरी लग्नासाठी मागे लागलेले .. कुणी मनात असेल तर सांगा असंही विचारण्यात आलं. पण दोघांनीही तसं काही नाही असच सांगितलं. त्यामुळे आईवडिलांनी आपल्या परीने स्थळ शोधण्यास सुरुवात केली.
एक दिवस विपुल च्या आईने एका मुलीचा फोटो त्याला दाखवून त्याचं मत विचारलं. आढेवेढे घेत त्याने फोटो बघितला. बघतो तर काय तो फोटो अंकिताचाच होता. लगेच त्याने होकार दिला.
कांद्यापोह्याचा कार्यक्रम झाला. विपुलच्या विचारात असलेली अंकिता बळेबळेच तयार झाली. चहा चा ट्रे घेऊन येते तर काय .. समोर विपुलला बघून तिच्या आश्चर्याला आणि आनंदाला पारावार उरला नाही.
लग्न ठरलं.. दोघांच्याही मनाप्रमाणे झालं.. संकोचामुळे ते बोलू शकले नाही पण त्यांच्या नशिबात हवं ते मिळेल असावं .. मनाप्रमाणे जोडीदार मिळाल्यामुळे दोघांचही आयुष्य आनंदाने आणि सुखाने बदलून गेलं.
©️®️ मनिषा चंद्रिकापुरे (५/१/२६)

