#माझ्यातलीमी
#अलकलेखन ( १०/९/२५)
@everyone
ट्रेन, स्टेशन ,रुमाल, नजर, पाऊस
©®सीए संगीता मेहता पुणे मधुमक्षिका
शीर्षक.. धार्मिक हिंसाचार.
..
कितीतरी यात्रेकरूंची कारसेवकांची हत्या,आगगाडी जाळून..राज्यभर दंगली पेटलेल्या.
ती नजर पत्रकाराची..भाषेवरूनही तिनं ओळखलेले.. कोण कारणीभूत याला.
तिनं मात्र एक जबाबदार नागरिक म्हणून पत्रकारिता मूल्यं क्षणभर बाजूला ठेवली आणि बातमी दिली..
“कुठल्या जमावाकडून जाणीवपूर्वक पूर्वनियोजित जाळपोळ नाही..ही तर अपघाती आग”
खऱ्या बातमीचा कागद भिजला;स्टेशनवर
भर पावसात तिनंही रूमालानं डोळे टिपले नाहीत
आणि खरी बातमीही आसवांसह वाहू दिली.
..
©®सीए संगीता मेहता पुणे मधुमक्षिका
..
टीप..
नाहीतर पत्रकारांमुळे परत धार्मिक हिंसाचाराची आग
अजून पसरत गेली व पेटतीच राहिली असती.. होय ना??


धन्यवाद मंजुरी करिता 🙏🏻
वेगळा विषय. सुंदर अलक.
दिलेल्या शब्दांचा उपयोग करून इतक सुंदर आणि अशा वेगळ्या विषयावर अलक लिहिता येऊ शकत .. असा विचारही मनात आला नाही .. खूप सुंदर लिहिल तुम्ही ..
वेगळ अलक लेखन… जबरदस्त
खूप छान