आठ महीन्याचे पोट सांभाळत ती कुंटणखान्यात मुलाखत देत होती.
तिच्या पोटाकडे पाहून वार्ताहराने विचारले –
“ह्याचे भविष्य काय?”
ती हसली कटाक्षाने –
“मुलगी धंदाच करेल! मुलगा दलाल होईल! अजून काय!”
तो म्हणाला –
“आम्हाला देशील? बघ, त्यांचे भविष्य बदलणे तुझ्या हातात आहे!”
ती विचारात पडली…
जमेल आपल्याला?
मना वर दगड ठेवून हा निर्णय घ्यायला?
आपल्यातल्या आईला? इथल्या बाईला?
झगडा द्यायला?
आपले भविष्य सोडून त्यांचे भविष्य घडवायला?
दोन मनांच्या द्वंद्वात ती पुरती अडकली…
– सौ. सीमा कुलकर्णी


Nice
सुरेख
सुरेख
सुरेख