inbound2079375221172389462.png

#माझ्यातलीमी
#शतशब्दकथा
#दुर्लक्ष

नंदिता जात्याची सुगरण होती. तिला वेगवेळया रेसिपी बनवायची, सगळ्यांना खाऊ घालायची आवड होती. कुकिंग विथ नंदिता नावाचं तिचं यू ट्यूब चॅनेल होतं त्यावर ती आपल्या रेसिपीज अपलोड करायची.
“नटून थटून स्वयंपाक करा, व्हिडिओ बनवा एवढा वेळ कसा काय मिळतो हिला? घरी इतर काही कामं नसतात का?” याची शेजारीपाजारी, नाट्यगोत्यात नेहमी चर्चा व्हायची. नंदिताच्या अपरोक्ष तिला नेहमी नावं ठेवली जायची.
‘कुछ तो लोग कहेंगे लोगोका काम है कहना’ म्हणत नंदिता या सगळ्याकडे दुर्लक्ष करायची, आपली आवड जपायची. हळूहळू तिचे व्हिडिओ व्हायरल व्हायला लागले, फॉलोवर्स, सबस्क्राईबर वाढू लागले. कामात सातत्य ठेवल्याने, टीकेकडे दुर्लक्ष केल्याने नंदिताची प्रगती झाली. तिची आवड तिची ओळख बनली.

©मृणाल महेश शिंपी.
०१.०९.२०२५

शब्दसंख्या १००

14 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!