दारूबंदी : महिला स्वातंत्र्य

inbound8915170055391293096.jpg

#माझ्यातलीमी
#शतशब्द_कथा_लेखन (१५/८/२५)
#शतशब्द_कथा
#स्वातंत्र्यदिन_आणि_आउटिंग
#दारूबंदी_महिला_स्वातंत्र्य

दारूबंदी : महिला स्वातंत्र्य
🧡🧡🧡🤍🤍🤍💚💚💚

स्वतंत्रता दिवस साजरा करण्यासाठी अनमोल सोसायटीची सहल वॉटर पार्क ला जायला निघाले. बस आली, सगळे जमले. तेवढ्यात सुगंधा मावशी जी सोसायटी मधील काही घरी स्वयंपाकाला जायची ती धापा टाकत आली आणि सांगायला लागली, “ताई, सायेब आमच्या झोपडपट्टीत त्या सीमा चा नवरा दारू पिऊन तिला शिवीगाळ करत आहे आणि मारहाण ही करतोय. रोजचीच गोष्ट आहे पर आज जास्तीच चढली त्याला. तुमि करा ना कायतरी.”
आता सगळ्यांनी ठरवले, सहल रद्द. पोलिसांना बोलावलं, त्यांना घेऊन सीमा च्या घरी जाऊन तिची सुटका केली, तिच्या नवऱ्याला पोलिस घेऊन गेले.

ही मंडळी आता दारूबंदी साठी पेटून उठली. ठरलेली बस होतीच. आजुबाजूच्या सगळ्या भागात जाऊन तिथले दारूचे अड्डे बंद पाडले. मुख्य म्हणजे त्या झोपडपट्टीतील बायकांना त्यांनी सोबत नेले. सगळ्यांनी एकत्रित येऊन दारूच्या बाटल्या जप्त केल्या. दुकानाच्या मालकाला आणि तेथील गिऱ्हाईकांना बाहेर ओढले. त्यांना समज दिली. यासाठी त्यांना पोलिसांनी देखील मदत केली.

अशा रीतीने गरीब कामकरी महिलांना दारुड्या नवऱ्याच्या जाचातून स्वातंत्र्य मिळवून दिले.

शब्दसंख्या : १४६

©️®️ मनिषा चंद्रिकापुरे (१५/८/२५)

31 Comments

  1. सामाजिक भान
    वेळेचा सुटीचा सदुपयोग

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!