तोच खरा सोबती

सोबत त्यांनाच घेऊन फिरा, जे तुमच्या गैरहजेरीत पण तुमची बाजू मांडतील.  या वाक्यावरून लघु कथा.  (१५/९/२५) 

…… तोच खरा सोबती ….. 

प्रिशा ऑफिसला गेली की, मालती ताईं नवरा व मुलगा ऐकतील अशा आवाजात बडबड सुरू करायच्या. लग्नाला इतके दिवस झाले तरी अजून वस्तू सापडत नाहीत. घरातल्यांच्या आवडी कळल्या नाहीत. कामाचा उरकच नाही. हळुबाई आहे अगदी. समीरची ऑफिसला जायची गडबड त्यात आईची बडबड. तरीही तो संयम ठेवायचा.  

आज त्याला घरून काम करायचे होते.  नेहमी प्रमाणे प्रिशा ऑफिसला गेल्यावर आईची बडबड सुरू झाली.  त्याने कंप्यूटर बंद केला व आई जवळ जाऊन बसला. तिचा हात हातात घेऊन म्हणाला की, आई तूझे बरोबर आहे पण प्रिशाचे तरी काय चुकते?  अगं ती एकूलती एक त्यातून एकत्र कुटुंबात वाढली. घरातील कामे करायला, घरात आजी, आई, दोन काकू, दोन वहिन्या असल्याने तिला कामाची सवय नाही.  ती इंजिनिअर आहे साईटवर उभे राहून काम करावे लागते. ती पण दमते. आपल्या ताईला पण कामाची सवय नव्हती पण लग्न झाल्यावर झाली ना.  हिला पण होईल. तू तिला काही बोलीस तरी ती उलटून बोलत नाही की, माझ्याकडे तक्रार करत नाही. कधीकधी मलाच वाईट वाटले तर मी म्हणतो की, आई बोलली म्हणून वाईट वाटले का तूला?  तर ती म्हणते, नाही रे. माझे चुकते म्हणून त्या सांगतात. मला यावे, मला कोणी नावे ठेऊ नये म्हणून त्या बोलतात त्यांचा तो हक्क आहे . मी प्रयत्न करते पण थोडा वेळ लागेल. 

मालती ताईं व  लेकाचे बोलणे सुरू असताना बाबा तिथे आले व म्हणाले, काय मालतीबाई आपले नवीन लग्न झाले तेव्हाचे आठवतय का?  तीच पुनरावृत्ती होतीये. असाच साथीदार हवा जो आपल्या गैरहजेरीत आपली बाजू मांडेल. खरं की नाही…. 

शब्द संख्या : २५३

5 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!