inbound7922015173208158997.jpg

आदितीच्या पत्रिकेत कडक मंगळ होता. चॉईसचा प्रश्नच नाही जो मुलगा तयार होईल लग्नाला त्याच्याशी तडजोड म्हणून लग्न करण्याची खुणगाठच बांधली होती तिने मनाशी. आजपर्यंत या पत्रिकेमुळे सतरा नकार पचवलेत तिने.तसे तर लग्नाची आणि नवऱ्याची स्वप्नं तिनेही पाहिली होती.पण परिस्थितीने तिला एकदम
शहाणपण आले होते.
तर आदित्यची कहाणी वेगळीच.त्याला उगीचच दुसरेपणीचा शिक्का बसलेला.त्याच्या पहिल्या बायकोने
आपल्या जीवनाचा शेवट, लग्नानंतर आठच दिवसांत स्वतःला जाळून घेत केला.आता याला कुणी मुलगी द्यायला तयारच होईना.नक्की कारण एक त्या देवाला आणि जीव देणाऱ्या बाईला माहित.
अंधारात उडी मारण्याचे साहस अंगी असलेली आदिती या लग्नाला तयार झाली. परिस्थितीशी दोन हात करण्याच्या तयारीने ती आली
पण तिला आदित्यने खूप सुखद धक्का दिला.वास्तविक आदित्यने आशाच सोडली होती परत लग्न होऊन सुखाचे दिवस येण्याची.
दोघांनीही मनाशी तडजोडीची खुणगाठ बांधत केलेले हे लग्न यशस्वी ठरले.दोघांनी एकमेकांना स्पेस देत आधार देत सुखाचा संसार केला.दुसऱ्याच्या कार्यक्षेत्रात कधीही लुडबुड केली नाही.
तिचा मंगळ कुठेच त्याला दिसला नाही. त्याच्या पहिल्या बायकोने आत्महत्या केली म्हणजे तो स्वभावाने कसा असेल ? ही भिती संसार करताना कधी डोकावली नाही तिच्या मनात..
पाहून पसंत करून खरेतर लिव्ह इन मध्ये राहूनही एकमेकांशी जमत नाही. जमवून घेता येत नाही. अशा परिस्थितीत “पाहिले न मी तुला
तू मला न पाहिले ” असे हे आदित्य आणि आदितीचे लग्न आणि त्यांचा सुखाचा संसार एक महान आश्चर्यच म्हणावे लागेल.
राधिकापाटणे

error: Content is protected !!