सगळ्यांना वाटायचं ती कायम शांत
पण कुणालाही माहीत नव्हतं की तिचे शब्द डायरीत दररोज बोलायचे. डायरीच तिचं खरं जग होत
क्षणोक्षणी मनात जे साचायचं, मोत्यासारखे शब्द पानांवर उतरवायची, की
शब्द तिचे मित्र होते, आणि शाई तिच्या भावनांची सावली. प्रत्येक पानावर तिचं दडपलेलं अस्तित्व उमटत होतं.
तिच्या मुलीला एक दिवस ती डायरी सापडली .
तिच्या कवितांमधून एक गहिरा आवाज झिरपत होता.
ती फक्त हसली. म्हणाली “मी काही कवयित्री नाही
मी फक्त लिहिलं – स्वतःला समजून घेण्यासाठी,
शब्दांत माझं अस्तित्व शोधलं मी ”शब्दांची दुनिया मला नेहमीच जवळची वाटायची.
लोकांमध्ये व्यक्त होता आलं नाही, पण डायरीमधून मन मोकळं करायला शिकले
आज तिच्या कवितेच्या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ होता.
