•पप्पा•
आपल्याला अनाथाश्रमातून पप्पांंनी आणलंय ही गोष्ट विभाला लवकर म्हणजे अकराव्या वर्षी कळाली.तेंव्हा पासून तिच्या मनात त्यांच्या विषयी अढी बसली.”पप्पा”म्हणायचे तिने सोडून दिले.
दुर्दैवाने पप्पांना कँन्सर झाला.आईने वारंवार सांगूनही ती फार
चौकशी करत नसे.
आणि एके दिवशी त्यांनी अंतिम श्वास घेतला.त्यांचे सामान लवकर हलविण्यासाठी विभाने त्यांचे कपाट उघडले.सहजच त्यांची डायरी दिसली.
“प्रिय पिल्लू विभास,
………..
……….
….. .. …. …..”
ती वाचत गेली.
“एकदा तरी पप्पा म्हणून हाक मार गं!”
हे तिला दिसेना. कारण डोळे वाहू लागले होते.
ती पप्पांची नाही तर आईची मुलगी होती, लग्नाआधी जन्मलेली.पण “जन्मतः मूल मेलेले होते .”
असे आईला सांगण्यात आले होते.
“पप्पा sss !”
तिने आर्त हाक मारली.
————————-–—————————-
(शब्द संख्या १००)
