रीना ला आज ऑफीस मधे असतानाच राहुल चे लग्न ठरल्याचे कळले. तिने एक सुस्कारा टाकला आणि आपल्या रोजच्या कामाला लागली.
घरी आल्यावर मात्र तिने कपाटात जपून ठेवलेली एक डायरी बाहेर काढली. त्या डायरी मध्ये तिने राहूल बरोबरच्या कितीतरी आठवणी लिहिल्या होत्या. त्यांची भेट कशी झाली? त्यांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात कसे झाले? तिचे रुसणे त्याने मनवणे. एकेक पान वाचत गेली तसा पूर्ण चित्रपटच जणू तिच्या डोळ्यासमोर उभा राहिला.
नकळत आलेल्या अश्रुंना तिने मोकळी वाट करून दिली आणि मनात म्हणाली. राहुल, आज तु जरी माझ्याबरोबर नसलास तरी ही डायरी आहे ना आपल्या सुंदर आठवणींची, ती मला आयुष्यभर पुरेल.

