#माझ्यातलीमी
#शतशब्दकथा
#डायरी
#स्वप्नीलकळ्या🥀
शीर्षक_माझ्यातलीमीचा_आविष्कार
लहानपणापासून सायलीचा
स्वभाव लाजराबुजरा व एकलकोंडा.
तिच निरागस,अल्लड बालपण एकटेपणात हरवलेलं .
पुढे तारूण्य काळात मनातील गोष्टी शेअर करू शकत नसल्याने तिची डायरीच तिची सखी बनली.रोजचे जीवन जगतांना येणारे अनुभव, आसपास घडणाऱ्या घटनांमधून मनातील सुखदुःख कथन करतांना तिने मनापासून लिहिलेलं डायरीचं प्रत्येक पान म्हणजे जणू एक सुंदर ललितलेखच!
मनातील सुप्त गोष्टी डायरीत उतरवताना तिची निरागसता,तिचे भाषा सौंदर्य, समाजाचे केलेले जाणीवपूर्वक परीक्षण-निरीक्षण, चिंतन- मनन ह्यातून अनेक सुंदर ललितलेख डायरीत संग्रहीत होत गेले.
” मनातील डायरीच्या
कागदावर उतरलं….
पानोपानी जनात
अलवारपणे पोहोचलं…”
तिच्या “डायरीसखी’मुळेच आज सायलीच्या ललितलेख संग्रहाला मानाचा राज्यपुरस्कार जाहीर झाला होता आणि सायलीचे जीवन कृतकृत्य व सार्थ झाले होते.
©® रोहिणी अग्निहोत्री
(स्वप्नीलकळ्या)🥀

Beautiful storu
Beautiful story