डायरी

#माझ्यातली मी
#शतशब्द कथा लेखन
# शब्द डायरी दि-२१/७/२०२५
📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖
🌹एक हळवी प्रेमकथा 🌹
सोनू’, नावाप्रमाणेच सोन्यासारखी होती; सगळ्यांसाठी मौल्यवान. पण नियतीच्या मनात वेगळं, बालवयातच तिने जगाला खरं प्रेम काय असतं, आयुष्याची आहुती देऊन शिकवलं.
अल्लड-अवखळ सोनू, वयात येताच एका अनामिक बंधनात अडकली. ‘त्याच्या’ प्रेमात ती आकंठ बुडाली, तिचं प्रेम अव्यक्तच राहिलं.कारण तिला कळलं, ‘तो’ दुसऱ्या कोणावरतरी प्रेम करतो. आतून पूर्णपणे खचलेली ती; मनातील सारं काही आपल्या डायरीत उतरवलं. नातेवाईक असल्याने त्यांची भेट व्हायचीच, प्रत्येक भेटीनंतर आपल्या भावना डायरीत लिहायची.
‘त्याच्या’ लग्नाचा दिवस जवळ येताच,सोनू आजारी पडली जगण्याची इच्छाच गमावली. ‘त्याच्या’ लग्नाच्या दिवशीच तिने अखेरचा श्वास घेतला.
तिच्या पश्चात, डायरीतून जाण्याचं कारण आई-वडिलांसमोर आलं. एका निष्पाप जिवाने केलेलं निस्सीम प्रेम, प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू आणणारं होतं. सोनू अमर झाली, तिच्या अतूट प्रेमामुळे. ~अलका शिंदे
शब्द संख्या 108
📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!