#माझ्यातलीमी#शतशब्दकथा (१५/८/२५)
#आऊटिंगआणिस्वातंत्र्यदिन
©®सीए संगीता मेहता पुणे मधुमक्षिका
शतशब्दकथा .. झंडा उंचा रहे हमारा
इतर सांस्कृतिक सहभाग कमी म्हणून त्या विद्यार्थ्याला
पहिल्या क्रमांकावरनं दुसऱ्यावर जावं लागलं.
शिक्षकांशी आता वाद घालण्यातून काहीच निष्पन्न होणार नव्हते.
पण,खरं सांगू.. पालकांना आता तरी कळायला पाहिजे होतं.. संस्कार मूल्य संवर्धन नीतीमत्ता हेही शिक्षणासह मुलांमधे यायला हवं.
पण नाही. काॅन्वेंटमधे आठवी नंतर प्रवेश घेतला आणि
मग मोकाट सुटले.. पालकही आणि मुलंही.
१५ ऑगस्ट,२६ जानेवारी म्हणजे “आऊटिंग टु डेज पिकनिक पिझा बर्गर “अशी समीकरणे डोक्यात फिट झाली.
शाळेतला मोतीचूर लाडू,मैदानावर परेड,प्रतिज्ञा, राष्ट्रगीत,कसरती हे सारं नको होतं..
पहाटे उठून
१५ ऑगस्ट दिनी.
रात्री जागरणात मात्र
कसला तरी उन्माद वाटायचा.
आजही बारावीच्या चांगल्या गुणप्राप्तीनंतर हवा भरलेली पोरं आऊटिंगच्या नावाखाली बेफाट सुटली.
कारला झेंडा लावत आत मात्र राॅक म्युझिकचा तारस्वरात
गोंधळ चालू होता.
पोचल्यावरती रेव्ह पार्टीचं पहिल्यांदाच आयोजन.
पोलिस बंदोबस्त असला तरी ड्रिंक आधी दोन दिवस
सोबत तयार होतीच.
छापा पडला आणि अर्धवस्त्रा बालांना अक्षरशः झेंडे लपेटून व्हॅनमध्ये कोंबले.
कितिकांनी आयुष्य झोकून देत मिळालेलं स्वातंत्र्य
आणि आता स्वातंत्र्याचा असा गैरवापर ..
नशेत झोकांड्या.
त्यांनी चेहरे झाकण्याचा जराही प्रयत्न केला नाही..
नशाच ना ती.
पण , कॅमेऱ्यात
कैद होताना
स्वातंत्र्यदिनी
ध्वज मात्र
काळवंडले होते..शरमले होते..
आज त्या सुपुत्राच्या आईवडीलांना आठवलं..
१५ ऑगस्ट २६ जानेवारीला शाळेत दांडी मारताना दिलेलं प्रोत्साहन आणि अशा कितीतरी चुका.
©®सीए संगीता मेहता पुणे मधुमक्षिका


अवश्य वाचा
अभिप्राय द्या
छोट्या गोष्टी छोट्या चुका
पण
परिणाम दूरगामी.. मोठा व तीव्र.
धन्यवाद मंजुरी करिता 🙏
मस्त खूप सुंदर कथा
मस्त हो
संस्कार तर हवेच पण संगतही चांगली हवी
आउटिंग मधले भरकटणे
स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे