#माझ्यातली मी
#वीकेंड टास्क
#कथालेखन
#चुकीच्या व्यक्तीला गेलेला मेसेज आयुष्य बदलून टाकतो
#शीर्षक….राधा मोहन
मीरा आणि राधा दोघी सख्ख्या बहिणी , पण दोघींच्यात जमीन आसमानाचा फरक . . मीरा दिसायला खूप सुंदर आणि उत्तम डान्सर . त्यामुळे तिचे खूप फॅन्स होते .
तर राधा वाचन वेडी , सुसंस्कारी , प्रामाणिक , आणि दुसऱ्यांना मदत करण्यासाठी तत्पर असणारी …
मोहन सुद्धा मीराचा फॅन होता . तिचे कितीतरी व्हिडिओ तो लाईक करायचा , कमेंट मध्ये तिची तारीफ करायचा . तारीफ करताना खूप छान छान शब्द वापरायचा , प्रत्येक वाक्य अर्थपूर्ण असायचं , दुसऱ्यांच्या मनाला इजा होणार नाही अशी त्याची भाषा असायची .
मीरा सतत डान्स मध्ये बिझी असायची , त्यामुळे प्रत्येक फॅन्सना ,राधाच उत्तर द्यायची. . आणि असेच वाचता वाचता मोहनचे सुद्धा कमेंट्स वाचायची … त्याच्या प्रत्येक शब्दातील आर्तकता तिच्या हृदयाला जाऊन भिडायची . जणू तो तिच्यासाठीच लिहितो आहे असे वाटून जायचे . दोघांचही छान जोळायचं , एकमेकांच्या भावना दोघांनाही पटायच्या . दोघे एका मताने विचार करायचे, त्यामुळे दोघांची छान जोडी जमली होती..,
शेवटी राधा मोहनच्या प्रेमात पडली . आणि आपल्या मोबाईल वरून ती त्याला मेसेज करू लागली . फक्त तुझ्याशी बोलण्यासाठी मी पर्सनल मोबाईल वापरते ,असे तिने मोहनला सांगितले …. मोहन मीराच्या प्रेमात आधीच पडला होता , फक्त मीरा कडून त्याला होकार हवा होता. आता मीरा कडून प्रत्येक मेसेजला प्रतिउत्तर येत असलेलं पाहून त्याला खूप आनंद झाला …
प्रत्यक्षात दोघे कधीही भेटले नव्हते . पण शब्दांच्या शिडीने प्रेमाचं उत्तम शिखर गाठलं होतं . आता माघार घेणं अशक्य होतं … मोहन खूपदा राधाला म्हणजेच मीराला भेटण्यासाठी बोलवायचा , पण राधा काहीतरी निमित्त करून भेटणं टाळायची.
असेच एकदा एका मोठ्या शहरांमध्ये मीराचा कार्यक्रम होणार होता . आता त्या वेळेला मीराला आपण सरप्राईज द्यायचं हे ठरवून मोहन त्या ठिकाणी जातो…
आणि मीराला चक्क आपल्या मित्रमैत्रिणी सोबत ड्रिंक्स करताना पाहतो … आता मीराला जाब विचारायचा म्हणून तिच्यासमोर जातो , पण मीरा त्याला अजिबात ओळखत नाही ,.. उलट त्याच्याच थोबाडीत मारते , आणि त्याचा अपमान करून पाठवते … मोहन एकही शब्द ना बोलता तो घरी निघून येतो आणि आपल्या मनातल्या मनात ठरवतो की अशा मुलीशी आपण नात जोडू नये जी मुलगी प्रत्यक्षात वेगळीच आहे आणि शब्दांमध्ये वेगळी आहे….
मीरा घरी येऊन आपल्या बहिणीला तिथे घडलेला सर्व प्रकार सांगते . तेव्हा राधाला खूप वाईट वाटतं . कारण ती मनापासून मोहन वर प्रेम करीत असते . पण मोहनला आता सांगायचे कसे . कारण मोहनचा तर मीरावर प्रेम आहे . आणि त्यांना आपल्याला पाहिलं सुद्धा नाही … मग आता तो माझा स्वीकार करेल का ?.. अशा प्रकारचे शंभर एक विचार ती करू लागते ..
इकडे मोहन मीराचे वर्तन , तिची भाषा , तिची वेशभूषा हे सर्व पाहून तो दंग झालेला असतो … आणि अशा मुलीवर आपण कसे प्रेम करू शकतो .., असा विचार करून त्यांनी मीराला आपल्या मनातूनच काढून टाकतो…
दोघांचेही मेसेज बंद झाले . पण दोघांनाही एकमेका वाचून करमेना . मोहन मनातून मीराला खूप खूप मिस करत होता . पण तिला भेटता क्षणीच तो तिच्यापासून दुरावला होता . शेवटी काय करायचं तेच त्याला समजत नव्हते…. अनेक वेळेला त्याला वाटून जायचे की , मेसेज करणारी मुलगी जर दुसरी असती तर किती छान झालं असतं .. ती सुंदर मीरा मिळाली नसती तरी चाललं असतं पण सुंदर मेसेज करणारी मुलगी जर मिळाली असती तर खरंच आयुष्य सुंदर झालं असतं …..
इकडे मोहनच्या प्रेमात पडलेली राधा मानसिकरित्या खूपच कमकुवत झाली होती , तिची तब्येत आता हाता बाहेर जात होती त्यामुळे तिला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आले … डॉक्टरनी तिच्या तब्येतीची अतिशय नाजूक रित्या काळजी घेतली पाहिजे असे सांगितले .. तेव्हा राधाच्या घरच्यांना आणि मीराला सुद्धा तिची काळजी वाटू लागली…. तेव्हा मीराने राधाकडून सारी माहिती काढून घेतली आणि तिने चक्क मोहनला गाठले ….
मोहन मीराला पाहून आश्चर्यच झाला , पण जेव्हा मीराने सारी हकीगत सांगितली त्यावेळेला मोहन खूप खूप खुश झाला … आणि राधाला भेटायला आला …
राधाला पाहताच मोहन चक्क आपल्या छातीवरच हात ठेवून घेतला … आणि त्याला त्याच्या डोळ्यावरच विश्वास बसेना ….कारण आपल्या शब्दांसारखीच राधा होती हे त्याला मनोमनी पटलं …. चुकीच्या मार्गाने का असेना पण राधाला जे हवं होतं ते मिळालं यासाठी राधा सुद्धा मनामध्ये देवाचं आभार मानू लागली….
रूपाली मठपती…
