#माझ्यातलीमी
#लघुकथाटास्कलेखन
गृहलक्ष्मी
आजही कामाच्या मावशी उशिरा आल्या ,नेहमीप्रमाणे नवऱ्याने दारू पिऊन मारहाण केली .मला प्रचंड राग आला, सरळ तिला घेऊन पोलिस स्टेशन गाठले . पोलिसांनी त्याला चांगला पोलिसी हिसका दाखवला . तिथल्या लेडी इन्स्पेक्टरने त्याची चांगलीच कानउघडणी केली ,
“अरे मुर्खा,बघ तुझ्या बायकोकडे कशी अवस्था झाली आहे तिची.
आजची स्त्री अबला नाही सबला आहे , सुशिक्षित,स्वतःच्या पायावर उभी आहे. त्याबरोबरच घरीदारी जबाबदा-या ओढवून घेतल्या आहेत. ख-या अर्थाने अष्टभुजा होऊन तीच काम चालू असतं.
नारीशक्तीला असे अष्टभुजा
गृहलक्ष्मी कुटुंबाचा आधार
तिच्या भावनेची करून कदर
कायम करा तिचा आदर
तुझ्या सारख्या पुरुषांनी एक लक्षात ठेवलं पाहिजे की अनेक शारीरिक आजारांच्या मुळाशीसुद्धा मानसिक ताण असतो.
मारहाणीमुळे ,अपमानास्पद वागणुकीमुळे तिला मानसिक अडचणी निर्माण होऊ शकतात. तिच्याकडे बघून कळत आहे तिची अन्नावरची वासना उडणे, तसेच निद्रानाश, अस्वस्थ झोप, थकवा जाणवणे हे मानसिक रोगांचे लक्षणे तिच्यात दिसू लागले .
लक्षात ठेव की आपल्या घरात जी स्त्री आहे ती लक्ष्मीच्या रूपात पाणी भरते , अन्नपूर्णेच रूप आहे , ही गृहलक्ष्मी घर सांभाळते ,सरस्वतीच्या रूपात मुलांना शिकवते , घराच्या रक्षणासाठी प्रसंगी दुर्गा बनते त्यामुळे पूजा नका करू पण कमीत कमी तिला सन्मान तरी द्यायला हवा ..
*खरंच ह्या सावित्रीच्या लेकींचं बाईपण भारी आहे* प्रत्येक क्षेत्रात तिची भरारी उत्तुंग आहे.
नवरात्रीतून तिच्या कष्टाची नऊ रुपं साकारताना तिच्या बरोबर पुरुषवर्गही या पूजेत सामील असतो. पण प्रत्यक्ष कृतीत मागासलेला..
स्त्रीचे गोडवे महिलादिनाचे दिवशी नाहीतर नवरात्रीत गायले जातात. एरवी तिच्या वाट्याला उपेक्षाच येते. सर्व बाबतीत तिला गृहित धरले जाते.
पुन्हा जर तुझ्या गृहलक्ष्मीशी असं वागलास तर कायमचा तुरुंगात टाकेल ”
निघताना पुन्हा असं करणार नाही असं वचन तर त्याने दिलं , पुढच पुढे …
सौ स्वाती येवले
शब्दसंख्या २५०


Very good👍