गाण्याचे रसग्रहण

IMG_20251004_003636.jpg

#माझ्यातलीमी
#विकेंडटास्कलेखन
#रसग्रहणगाण्याचे
@everyone
३/१०/२५

चित्रपट- चिंटू
♥ गायक- शुभंकर कुलकर्णी आणि अंजली कुलकर्णी
♥ संगीत- सलील कुलकर्णी
♥ गीत- संदीप खरे

♫ Lyrics ♫
एकटी एकटी घाबरलीस ना…
एकटी एकटी घाबरलीस ना वाटलाच होत आई
एकटी एकटी घाबरलीस ना वाटलाच होत आई
म्हणूनच तर सोडून तुला लांब गेलो नाही
एकटी एकटी घाबरलीस ना वाटलाच होत आई
म्हणूनच तर सोडून तुला लांब गेलो नाही

माझं सगळ्यात आवडत गाण .आई मुलाच नात अनमोल , अद्वितीय असत . जन्मतःच एकमेकांशी नाळ जोडलेली असते .. मुल गर्भात असताना ,आई जेवली की बाळाचं पोट भरत आणि मुल मोठं झालं की मुलं जेवली की आईचं समाधानान पोट भरत ..

ह्या गाण्याबद्दलचा अनुभव म्हटला तर माझा मुलगा लहान असल्यापासूनच मला हे गाण प्रचंड आवडत ..कित्येक वेळा त्याला झोपवताना ह्या गाण्याचा आईच्या तोंडी असलेली कडवी , जास्त करून ह्या दोन ओळी , ” माझा आहेस अजून ये रे माझ्या पाशी राहा
अंगाईच्या कुशीमध्ये छान स्वप्ना पहा ”
ह्या ओळी म्हणून त्याला झोपवायची..

खरोखरच किती सुंदर अर्थ आहे ह्या गाण्याचा , सुरवातीला निष्पाप मुलगा आईला म्हणतो ,”
एकटी एकटी घाबरलीस ना वाटलाच होत आई
म्हणूनच तर सोडून तुला लांब
गेलो नाही ” … मूल जवळ नसताना आईचा जीव व्याकुळ होतो ते ती एकटी रहायला घाबरते म्हणून नाही तर तो ह्यासाठी तिला काळजी असते की तीच मुल ह्या बाह्यजगात सुरक्षित ,सुखरूप राहू शकेल ना ..म्हणूनच आई म्हणते ,
“”विचारांनी साऱ्या कस गलबलायला होत
अंधार असतो फार मोठा पिल्लू असतं छोटं
नाजूक नाजूक त्याचा जीव नाजूक नाजूक मन
कोवळी काच सोसेल कसे भविष्याचे धन …”

आणि मुल कितीही मोठी झाली तरी आई काही काळजी करण सोडत नाही म्हणूनच आई म्हणते ,

“मोठी होतात
मोठी होतात मुलं आई मोठी होत नाही…

त्यामुळे , कुशीत नसता पिल्लू तेंव्हा घाबरतेच रे आई …”

आपले आई वडील आपल्यासाठी किती कष्ट करतात ह्याची जाणीव प्रत्येक मुला, मुलीने ठेवलीच पाहिजे .. जेव्हा आई वडील म्हातारे होतात तेव्हा मुलांनी आई वडिलांची त्यांच्या मुलांसारखी काळजी घेतली पाहिजे ..

पण बऱ्याच वेळा आपल्याला बघायला मिळत की मुलं आई वडीलांना सोडून परदेशात जातात ते अगदी त्यांच्या अखेरच्या यात्रेला ही येत नाहीत ..

किती गहन अर्थ आहे ह्या गाण्याचा , किती अप्रतिम शब्द रचना आहे गीतकार संदीप खरे ह्यांची .. मुल लहान असताना आई म्हणते की ,

“लहान आहेस तोवर निदान कुशीत घेता येईल
मोठा होशील उडून जाशील तेंव्हा काही होईल
कोण असशील कुठे असशील करशील काही तेंव्हा
लहान होऊन कुशीमध्ये शिरशील काही तेंव्हा…”

खरोखरच ,जितक आई मुलाच नात भावनिक , सुरक्षित , निरोगी तितक मुलांच्या सामाजिक आणि भावनिक विकासालाही चालना मिळते ..

मला माझ्या कामानिमित खूप टुरिंग करावे लागायचे , तेव्हा अक्षरशः हृदयावर दगड ठेवून माझ्या मुलापासून लांब जाव लागायचं तेव्हा त्याच्या आठवणीने,काळजीने अगदी गलबलून यायचं ..

म्हणूनच , मी जॉब सोडल्यावर ,मी आणि माझ्या मुलाने जेव्हा एकत्र व्यवसाय सुरू केला तेव्हा तो मला तेच म्हणाला ..

” एकटी एकटी घाबरलीस ना वाटलाच होत आई
म्हणूनच तर सोडून तुला लांब गेलो नाही..” आणि त्याचा नेहमीच,आवडत वाक्य ,” मी आणि आई सॉलिड टीम “.

सौ स्वाती येवले .

फोटो …मनिषा चंद्रिकापूरे ह्यांच्या सौजन्याने.

694 Comments

  1. खुप भावस्पर्शी .. एकदम मस्त ..

  2. Site web 1xbet congo – paris sportifs en ligne sur le football et autres sports. Propose des paris en direct et a l’avance, des cotes, des resultats et des tournois. Description detaillee du service, des fonctionnalites du compte et de son utilisation au Congo.

  3. Site web de parifoot rd congo: paris sportifs, championnats de football, resultats des matchs et cotes. Informations detaillees sur la plateforme, les conditions d’utilisation, les fonctionnalites et les evenements sportifs disponibles.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!