…. गरज आणि हव्यास…

# माझ्यातली मी #
…. लघुकथा लेखन टास्क…. २०/१०/२५
( ऋण काढून सण नकोत )
……… गरज आणि हव्यास……..
या या श्रीकांतराव, बरेच दिवसांनी आठवण आली मामांची दिनकरराव बोलले.
मामा, आठवण तर येतेच हो पण एवढा मोठा बंगला घेऊन मी कर्जबाजारी झालो. त्यासाठी जास्त हातपाय हलवावे लागत आहेत.
श्रीकांत, मग कशाला एवढी स्वप्न रंगवायची. तुझा दोन बेडरूमचा फ्लॅट काय वाईट होता. घरात इनमीन तीन माणसे. एवढा बडेज्यावाचा डिंडोरा कशाला.
मामा, माझ्या सगळ्या मित्रांकडे मोठमोठी बंगले आहेत. म्हणून मी पण कर्ज घेऊन हे पाऊल उचललं.
बाहेर गेलेली मामी आत येते. बाहेरून येता येताच तिच्या कानावर दोघांमधल्या गोष्टी पडतात. न ऐकल्यासारखं करून त्याची चौकशी करते. गरम गरम कांदाभजी खाणार का म्हणून विचारते. तोही तयार होतो. कांदाभजीचा स्वाद व चव त्याला त्याच्या दुःखातून थोडा वेळ बाजूला ठेवते.
मामा म्हणतात,
कर्ज फेडण्याचं पाऊल प्रगतीपथावर आहे ना.
श्रीकांतने मान डोलावली.
मामा, मी चाळीतून फ्लॅटमध्ये आलो. दुसऱ्यांच बघून बंगला घेतला. जुन्या वस्तूंना बाहेर काढून सुखासीन गोष्टी घेतल्या. करमणूक म्हणून संसार सुखाचा बनवला पण कर्जाचा डोंगर वाढवला.
अरे पण, कर्जाला मुदत असेलच.
मामा, आता आठ दिवसच राहिलेत. हा डोंगर मी पार करू शकत नाही.
मग आता!
मामा, आशेने मी तुमच्याकडे मदत मागायला आलो. मामांची घरची परिस्थिती उत्तम. दोन करोड पैकी उरलेले २५ लाख मी फेडू शकत नाही.
कराल का मामा मदत मला? केविलवाण्या आशेने त्याने मामांकडे प्रश्न केला. मामा -मामींनी एकमेकांकडे बघून मदतीला होकार दिला. मदत करायची पण ती पूर्ण वसूलही करायची. वसूल जर केली नाही तर हा असाच कर्ज न फेडता कर्ज घेतच राहणार.
मामांनी त्या बोलीवर त्याला कर्ज दिल पण महत्त्वाचा एकच सल्ला दिला……
श्रीकांत, अरे लक्झरीचा विचार करणे चुकीचे नाही. फक्त आपले अंथरूण पाहून पाय पसरावे.
” ऋण काढून सण नकोत ” ही उक्ती त्याला पटली.
…. शब्द संख्या २५०…..
……. अंजली आमलेकर……. २३/१०/२५

error: Content is protected !!