…… गरजेची वेळ……

# माझ्यातली मी #
…….. लघुकथा लेखन टास्क……… (१९/१/२६)
……. खूप गरज असल्यावर
निस्वार्थ मनाने धावून येणारी व्यक्ती करोडो रुपयांपेक्षाही महाग असते….. संगीता मॅडमच्या या ओळीवरून लघुकथा……
••••••••• गरजेची वेळ ••••••••••••
श्रीमंतीत वाढलेला एक तरुण युवक राजेश हा लाडाने वाया गेलेला होता. आई वडील दोघेही नोकरी करत असल्याने त्यांचे त्याच्याकडे दुर्लक्ष होत होते. सुरुवातीपासूनच तो अभ्यासात डावा होता. पहिली दुसरीत असताना सुद्धा तो काठावरच असायचा. आई वडील नुसते दम भरायचे, वाटल्यास चार फटकेही द्यायचे पण आपला मुलगा कितपत वर्गात लक्ष देतो, त्यांच्या शिक्षकांना जाऊन भेटणे त्यांना जमलेच.नाही

त्याला एक मोठा भाऊ पण होता. तो अतिशय हुशार. त्याने बाबांना सांगितले की बाबा, शाळेचे शिबिर भरणार आहे. त्या शिबिरात त्याची रवानगी करा. काहीतरी त्याच्यात बदल होईल. तेथेही टाकून पाहिले पण पालथ्या घड्यावर पाणी. जेथे पैशाची धाव असणाऱ्या आई-वडिलांचे लक्ष नाही तेथे मुलांचे काय होणार! नुसती मारपिट करून व दम भरून भागत नाही.

दहावीची परीक्षा आली. आता बाकीच्या मित्रांची प्रगती बघून त्यालाही थोडीशी उपरती झाली. पण थोडक्याअभ्यासाने काही होत नसते. नापासचा शिक्का लागलाच. पठ्ठा घरी जायला तयार नाही. वडिलांच्या धाकाला व त्यांच्या माराला घाबरून तो एका विराण जागी झाडाच्या खाली बसून राहिला. त्याने हाताने डोळे झाकून घेतले व मी आता काय करू ? माझे कसे होणार? असे बडबडू लागला. बाजूलाच एक गरीब इसम बोरे व चिंचा घेऊन विकायला बसला होता. तो त्याच्या जवळ आला व म्हणाला,
बाळा, असा काय बसलास,आणि तू हे काय बडबडतोयेस. त्याने त्यांना त्याच्या मनात चाललेली घालमेल सांगितली.
त्या गरीब इसमाने त्याला सांगितले की बाळा, जसं नरमांस भक्षण करणं हा जसा गुन्हा आहे तसेच मानसिक दुःखाने मरणाचे पाऊल उचलणे सुद्धा वाईट आहे.
राजेश म्हणाला,
तुम्हाला माझ्या बाबांचा स्वभाव माहित नाही.

तो इसम तडक त्याच्या बाबांना भेटला व लहान तोंडी मोठा घास घेऊन त्यांना समजाविले. आई-वडिलांनी सुद्धा मुलगा नापास झाला म्हणून आपली पत जाईल पण तसे नाही.तुम्ही त्याला अब्रू वाढविण्याचे माध्यम समजू नका. सुशिक्षित आई-वडिलांना त्या गरीब इसमाचे सांगणे पटले…. मी माझ्या मुलाला चांगले समजावून मोठे करीन आणि झाले ही तसेच.
……. म्हणूनच म्हणतात गरज असल्यावर
निस्वार्थ मनाने धावून येणारी व्यक्ती करोडो रुपयांपेक्षाही महाग असते……..
…… शब्द संख्या…… २९८
……… अंजली आमलेकर……….

error: Content is protected !!