#माझ्यातलीमी
#अलकलेखन (३/८/२५)
#खरे_यश
“या ही अवस्थेत तिने/त्याने स्वतःला समजावले ..” या वाक्याचा उपयोग करून #अलक लेखन
———————————————-
🧡 खरे यश 🧡
प्रात्यक्षिक परीक्षा सुरू होती. दोन प्रात्यक्षिक परीक्षेत तीन दिवसांची सुटी असायची.
अशातच तिच्या वडीलांना हृदयविकाराचा झटका आला. दवाखान्यात त्यांच्या शेजारी बसून ती उद्याच्या प्रात्यक्षिक परीक्षेचा अभ्यास करत स्वतःला समजावत होती “मी शैक्षणिक आणि जीवनातील दोन्ही परीक्षेत यशस्वी होणार.”
एका महिन्यानंतर वडीलांना डिस्चार्ज मिळाला आणि ती पण विद्यापीठात तिसरी आली.
©️®️ मनिषा चंद्रिकापुरे (३/८/२५)


ही माझ्या वर्ष मैत्रिणीची खरी कहाणी आहे
वर्ग मैत्रिणीची