खरी भक्त माऊली ची

# माझ्यातली मी #
**** शतशब्द कथालेखन *****
……. खरी भक्त माऊलीची……
महाराष्ट्रातील एक अत्यंत महत्त्वाची ओळख म्हणजे ” पंढरीची वारी”. पांडुरंगावर माझे नितांत प्रेम व दृढ श्रद्धा. सासरही भाविक. वारीचे बाळकडू तिथेच मिळाले. लग्नाच्या दुसऱ्याच वर्षी वारीचा योग आला. नवऱ्यानेही चलण्यास संमती दिली.
निघण्याच्या दोन दिवस आधी तापाने फणफणले. प्रचंड अशक्तपणा. अशाही अवस्थेत घरच्यांची नाराजी पत्करून लुगडे नेसून व डोईवर तुळस घेऊन टाळ मृदुंगाच्या गजरात फुगडी आणि रिंगणाचा आनंद घेत पंढरपूरला पोहोचलो.
प्रचंड गर्दी बघून वाटले होईल ना दर्शन! देवा कुठे आहेस? तुझ्यासाठी मी जीव पाखडते. दर्शन दे मला. अचानक विजांच्या कडकडाटाने भानावर आले. समोर लुकलुकणारा तारा बघते तर दर्शनाची रांग पुढे जाऊन मी प्रत्यक्ष विठ्ठला समोर. पायावर डोके ठेवून स्वर्गसुख उपभोगले. 🙏🙏
…… अंजली आमलेकर….. २३/६/२5

19 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!