inbound888418191191556025.jpg

#माझ्यातलीमी
#विकएंडटास्क(१२/३/२६)
#कथालेखन
@everyone

लहानपणापासून राजन मुलां मध्ये रमतच नवहता. त्याला मुलीं सोबत खेळायला आवडायचे. रेवती ला वाटायचे लहान आहे राजन मोठा झाला की समजेल . पण वयाच्या 12 व्या वर्षी ही राजन मुलां मध्ये मिसळत नवहता. एकदा घरी कोणी नसताना त्याने रेवती ची साडी नेसली मेकअप केला ते रेवती ने पाहिले आणि त्याला खूप मारले. राजन म्हणाला,आई मी मुलगी आहे अशी भावना मला आतून येते. राजन तृतीय पंथी होता. तो मोठा झाल्यावर काही किन्नर लोक येऊन त्याला घेऊन गेले. रेवती ने ही मोठे धाडस दाखवले आपला मुलगा जसा आहे तसा त्याला स्वीकारले. त्या लोकां सोबतच तो सुखाने जगू शकतो नाहीतर हा आपला समाज त्याचे हालहाल करेल. म्हणून रेवतीने मनावर दगड ठेवून आपल्या मुलाला आपल्या पासून दूर केले.

©® Author Sangieta Devkar
#authorsangietadevkar

संगीता मॅम यांच्या कथेतील वरील भागापासून पुढील कथा

❤️ खरी ओळख ❤️

लहानपणापासून राजन मुलां मध्ये रमतच नवहता. त्याला मुलीं सोबत खेळायला आवडायचे. रेवती ला वाटायचे लहान आहे राजन मोठा झाला की समजेल . पण वयाच्या 12 व्या वर्षी ही राजन मुलां मध्ये मिसळत नवहता. एकदा घरी कोणी नसताना त्याने रेवती ची साडी नेसली मेकअप केला ते रेवती ने पाहिले आणि त्याला खूप मारले. राजन म्हणाला,आई मी मुलगी आहे अशी भावना मला आतून येते. राजन तृतीय पंथी होता. तो मोठा झाल्यावर काही किन्नर लोक येऊन त्याला घेऊन गेले. रेवती ने ही मोठे धाडस दाखवले आपला मुलगा जसा आहे तसा त्याला स्वीकारले. त्या लोकां सोबतच तो सुखाने जगू शकतो नाहीतर हा आपला समाज त्याचे हालहाल करेल. म्हणून रेवतीने मनावर दगड ठेवून आपल्या मुलाला आपल्या पासून दूर केले.

राजन त्यांच्यासोबत गेला पण तो खूप रडत होता. त्याला खूप वाईट वाटत होतं की त्याच्या आईने त्याला पाठवून दिल. कारण त्याला असं वाटत होतं की हा काय त्याचा गुन्हा होता का की त्याला मुलगा नाही तर मुलीसारख आयुष्य जगावसं वाटतं? त्याला खरंच कळत नव्हतं की त्याची याच्यात चूक काय आहे ?

इतर किन्नर राजनशी कितीही प्रेमाने वागायचा प्रयत्न करत होते तरी राजन त्यांच्या बरोबर राहू शकत नव्हता कारण त्याला पुढे खूप शिकायचंय होतं आणि मुख्य म्हणजे त्याला मानाने जगायचं होतं ..त्याला असं टाळ्या वाजवून ,पैसे कमावणं मान्य नव्हतं ..पण त्याला हे ही कळत होत की किन्नर पुढे दुसरा उपजीविकेचा पर्याय नाही म्हणून ते नाईलाजाने तस आयुष्य जगत आहेत ..त्याला त्याबद्दल खूप वाईट ही वाटत होतं ..

पण त्याने ठरवलं होतं की आपण त्यांच्यासारखं नाही जगायचं ..आपण काही झालं तरी पुढे शिकायचं … आणि मुख्य म्हणजे त्याला हेच वाटायचं की आपल्याला मुलगी म्हणून जगावसं वाटतं तर ही आपली चूक नाही …

आणि शेवटी एक दिवस संधी साधून राजन तेथून पळाला आणि तो एका मंदिराच्या ठिकाणी आला … मंदिरात कोपऱ्यात बसून तो रडत होता.. त्याच वेळेला त्याच्याकडे एका जोडप्याचं लक्ष गेलं ..विजय आणि तनुजा हे दोघेजणही त्यावेळी मंदिरात पूजेसाठी आले होते ..

विजय आणि तनुजा हे दोघेही खूप दुःखी होते कारण त्यांची बारा वर्षाची मुलगी अचानक ब्लड कॅन्सरने वारली होती.. भरपूर पैसा हातात होता पण ते त्यांच्या मुलीला ,तन्वीला वाचवू शकले नाही .. त्यांना क्षणोक्षणी तन्वी ची खूप आठवण यायची , जगण्याची जणू त्यांची इच्छा राहिली नव्हती .. मन शांत व्हावं म्हणून ते मंदिरात आलेले होते . आणि त्यांचे लक्ष रडत असलेल्या राजनकडे गेले ..

त्यांनी राजनला विचारलं, “अरे बाळा, तू का रडतोयस ? ”
तर राजन म्हणाला की काय सांगू मला माझ्या आईने घरातून घालवून दिलं कारण तिला मी नकोसा झालो ..तेव्हा त्यांनी विचारलं , ” का ? असं काय झालं ? तुझी काही चूक झाली का? ”

विजय ,तनुजा च्या पायाखालची जमीन सरकली जेव्हा राजन म्हणाला , ” हो माझी एकच चूक झाली की मला मुलगा म्हणून नाही तर मुलगी म्हणून जगाव अस वाटतं …”

विजय आणि तनुजा हे दोघेही गोंधळून जातात , त्याला विचारतात ,” मग तू घरातून बाहेर पडल्यावर इथे आलास का ? ”

विजय ,तनुजाच्या डोळ्यातून अश्रू वाहयला लागतात जेव्हा राजन त्यांना सांगतो की माझ्या आईने काही किन्नर ना बोलावलेलं आणि मग मला त्यांच्या स्वाधीन केल. पण मला त्यांच्याबरोबर आयुष्य जगणं मान्य नव्हतं .. म्हणून मी तिथून पळालो. मला खूप शिकायचंय डॉक्टर व्हायचं आहे ..आणि मला मुलगी म्हणून जगावसं वाटतं , ती भावना माझी आहे तर माझी काय चूक ?

विजय ,तनुजा दोघे ही ठरवतात की राजन ला जमेल तितकी मदत करायची … ते दोघे राजनला त्यांच्या घरी घेऊन येतात ..

विजय , तनुजा ला वाटतं की तन्वी नंतर त्यांच्या आयुष्यात राजन त्यांना मंदिरात भेटला म्हणजे ही देवाची , नियतीचीच इच्छा आहे की त्यांनी राजन च आयुष्य घडवावं.. ते राजन ला एका चांगल्या नावाजलेल्या हॉस्पिटल मधे दाखवतात .. डॉक्टर त्यांना सल्ला देतात की त्यांनी राजन ची हार्मोन्स रिप्लेसमेंट थेरपी करावी आणि ट्रान्सजेंडर करावं, मेडिकल दृष्टीने राजन च्या बाबतीत ते शक्य आहे ..

हार्मोन्स रिप्लेसमेंट थेरपीमुळे हळूहळू राजन मध्ये मुलींमध्ये होतो तसा स्तनाचा विकास, त्वचेत मऊपणा अशा गोष्टी दिसू लागल्या .. विजय तनुजा ने कायदेशीर रित्या राजन ऊर्फ तन्वी ला दत्तक घेतले ..राजन च्या रूपात त्यांना त्यांची गेलेली तन्वीच जणू परत मिळाली होती ..

तन्वी डॉक्टर झाली ..विजय , तनुजा ने कर्करोग उपचारासाठी एक हॉस्पिटल सुरू केलं होत ..तसेच तन्वी ने एक एन जी ओ स्थापन केली जिथे किन्नर ह्यांच्या समस्या ,त्याचं शिक्षण ,तसेच ज्यांचं मेडिकली ट्रान्सजेंडर शक्य आहे ते करून घेणं अशी समाजसेवेची काम ही तिने त्या संस्थे मार्फत सुरू केली ..

वयाच्या पंचविसाव्या वर्षी तन्वी तिच्या मम्मी, पप्पा ना घेऊन तिच्या आईला रेवतीला भेटायला घरी जाते तेव्हा साहजिकच रेवती तन्वी ला ओळखत नाही .. तन्वी जेव्हा रेवतीला सांगते आई मी तुझा राजन ..तेव्हा तिच्या आईच्या डोळ्यातून आनंदाश्रु वाहायला लागतात ..तनुजा रेवतीला राजन मंदिरात भेटल्यापासून ची पूर्ण माहिती रेवतीला देते..

तनुजा हात जोडून रेवती ला विनंती करते की तुम्ही जरी हिला जन्म दिला असला तरी तुम्ही माझ्या तन्वीला माझ्यापासून दूर करा नका ..

रेवती म्हणते की माणसाची खरी ओळख फक्त जन्माने ,नावाने होत नसते तर खरी ओळख त्याच्या कर्तृत्वाने आणि त्यातून कमावलेल्या नावाने होते .. जे तुमच्यामुळे तिला मिळालं.. जे आयुष्य तुमच्या मुळे तिला मिळालं ते मी कदाचित कधीच देऊ शकले नसते त्यामुळे ती खऱ्या अर्थाने तुमचीच मुलगी आहे ..तिची कायम ओळख तुमची कर्तृत्ववान ,समाजासाठी , किन्नरांसाठी झटणारी एक डॉक्टर मुलगी म्हणूनच राहील ..

सौ स्वाती येवले

error: Content is protected !!