समीर ,अनय आणि रिया ,दृष्ट लागावी अशीच ही त्रिकुटाची मैत्री. शिक्षणानंतर तिघांची नोकरीत निवड झाली.आजकाल मात्र रियाला या मैत्रीतून प्रितीचे कोंब रुजण्याची चाहूल लागली. दोघांना तिचे वाटणारे आकर्षण तिला जाणवू लागले होते.पण मन काहीसे अस्वस्थ होते.तिला प्रथमच स्वतःच्या मनाचा कौल कळत नव्हता. बुद्धिमान,शांत काहीसा गंभीर अनय की हुशार, चैतन्यपूर्ण, तोंडभरून कौतुक करणारा समीर? मन तरी असे खट्याळ की प्रश्न विचारताच रोज नवे उत्तर देणारे. जाऊ दे आता या विषयाच्या मागे लागायचे नाही असे रियाने ठरवले. इकडे रियाने मनाला थोपवले पण काळास कोण थांबवणार ?
समीरला बंगलोर ऑफिसचे पोस्टिंग मिळाले ,त्याला निरोप द्यायला तिघे हॉटेलला एकत्र भेटले,खूप गप्पा झाल्या,मन जड झाले तेवढ्यात अनय फोन घ्यायला बाहेर गेला. जो प्रश्न रिया टाळत होती तो अचानक समोर उभा ठाकला .मोकळ्या स्वभावानुसार समीरने समोरच्या फुलदाणीतले फुल रियाला देत विचारले “तुला कायमचे माझ्याबरोबर बंगलोरला न्यायला कधी येऊ? “तिच्या उत्तराची वाट न बघता तो जो भरभरून बोलत सुटला तो अनय आल्यावरच थांबला.
खरे तर अनय कधीच आत आला होता पण समीरला रियाला फुल देताना बघून
तो जाणीवपूर्वक उशिरा टेबलाजवळ आला.समीर खुशीतच अनयला म्हणाला “मला निघालं पाहिजे तू रियाला कंपनी दे आणि घरी सोड.उद्या सकाळीच फ्लाईट आहे बंगलोरची” आणि झंझावाताप्रमाणे तो निघूनही गेला.
अनय रियाशी समीर बद्दलच बोलत बसला.समीर कसा हुशार,स्मार्ट आहे,
तो आयुष्यात कसा पुढे जाईल.समीरची
पार्टनर कशी लकी असेल वगैरे वगैरे . अचानक त्याला ठसका लागला , डोळ्यातील पाणी त्याने रुमालात लपवले. तीला त्याचे हे ठरवून ,विचारपूर्वक बोलणे खूप काही सांगून गेले.अनयने तीला घरापर्यंत सोबत केली आणि रियाने कायमची त्याची साथ निवडली .
©® जयश्री दिक्षित

छान
छान कथानक
👌🏽👍🏻