कृष्ण सावळा

Screenshot_20250815-100719.jpg

कृष्णम वंदे जगद्गुरु🙏🙏
  श्री ‘कृष्ण’ एक आगळे वेगळे दैवत…
त्याच्या मामाच्या हाती मृत्यू होणार पण नियती काही औरच…त्याने अवतार घेतला…त्याचा जन्म झाला आणि त्याच्या पित्याने त्याला दुसरीकडे सोपवले…जन्मदाता आणि पालनकर्ता असे मातृ आणि पितृ प्रेम लाभले… देवकीचा नंदलाल. यशोधेचा गोपाल. गोकुळ निवासी होऊन द्वारकाधीश जाहला. बाळ गोपाल असताना काय तो नटखट पणा..दूध, दही, लोणी खाणारा…
मथुरेच्या गोपिकाबाईंना अडवून मटकी फोडणारा …त्याच्या ह्या कृत्यामुळे अनेक तहान भागल्या…गरजवंताने दूध,दही चाखले…हाच तो कृष्ण…भागवणारा! सुदाम्याशी मैत्री म्हणजे कोण गरीब? कोण श्रीमंत?? व्यक्ती ओळखा…संदेश देणारा…जाती धर्म एक करणारा…तो श्री कृष्ण!! 🙏🙏
तारुण्यात राधा वर प्रेम करणारा आज ही पूजनीय आहे. जगात सर्वत्र म्हणुनच राधेच्या पुढे त्याचे नाव हाच तो राधेश्याम! बालरुपी तो लाडाने पुजला जातो
परंतु तोच कृष्ण श्री अवस्थेत समजावा लागतो. राधेशी विवाह न होता रुक्मिणी चा झाला. वर मागितला सत्यभामाने परंतु तिला काही प्राप्त न झाला. नरकासुराच्या बंदिवासात असलेल्या स्त्रियांना स्वातंत्र्य करून लोक लाजे खातर आपले नाव देणारा…”श्री कृष्ण”. गोवर्धन पर्वत उचलणारा, द्रौपदीची सहायता करणारा, अर्जुनाचा सारथी बनणारा, मधुर बासरी वाजवणारा तो मुरलीधर! कंसाला त्याच्या कर्माची फळं देणारा तो नारायण! मोरपंख लावून..कामधेनू प्रिय असणारा वृंदावनात रासलीला करणारा तो बाके बिहारी!
मधुर बासरी वाजवणारा हा मुरारी प्रसंगी सुदर्शन चक्र हाती घेऊन महाभारत जिंकून घेतो…इथेच कृष्ण समजला जातो…भक्ती तिथे शक्ती आणि युक्ती तिथे युद्धाला शती…तेव्हा जागृत होऊन राहावे वागावे…प्रसंगी गुंतून न राहता न्यायाने जगावे आणि श्रद्धा सहित कर्म करीत राहावे हेच सांगते भगवद्गीता
ॐ कृष्णाय नमः
ॐ वासुदेवाय नमः
हरे राम हरे राम
राम राम हरे हरे
हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे 🙏

20 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!